गुपचूप झाली सर्वात स्वस्त शाओमी स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या Redmi 10A चे स्पेक्स 

By सिद्धेश जाधव | Published: March 29, 2022 12:45 PM2022-03-29T12:45:18+5:302022-03-29T12:45:27+5:30

Redmi 10A स्मार्टफोन MediaTek Helio G25 SoC, 6GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. 

Redmi 10A Launched With 5000mAh Battery 13MP Camera Check Price And Specs  | गुपचूप झाली सर्वात स्वस्त शाओमी स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या Redmi 10A चे स्पेक्स 

गुपचूप झाली सर्वात स्वस्त शाओमी स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या Redmi 10A चे स्पेक्स 

googlenewsNext

Xiaomi चे स्वस्त स्मार्टफोन्स सब-ब्रँड Redmi अंतर्गत सादर केले जातात. असाच एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन कंपनीनं गुपचूप चीनमध्ये सादर केला आहे. MediaTek Helio G25 SoC सह Redmi 10A स्मार्टफोन कंपनीनं लाँच केला आहे. हा फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. ज्यात 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 6GB रॅम देण्यात आला आहे.  

Redmi 10A चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi 10A स्मार्टफोन 6.53-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनला ऑक्टा-कोर मीडियाटेक Helio G25 प्रोसेसरसह PowerVR8320 GPU ची प्रोसेसिंग पावर दिली आहे. रेडमीचा हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. सोबत 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतची स्टोरेज देण्यात आली आहे.  

Redmi 10A स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसहा 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 5MP चा सेल्फी शुटर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स तर मिळतात सोबत कमी किंमतीत देखील रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे. Redmi 10A स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह सादर झाला आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Redmi 10A ची किंमत 

Redmi 10A स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट्स लाँच झाले आहेत. या फोनचा 4GB/64GB मॉडेल 649 युआन (सुमारे 7,740 रुपये), 4GB/128GB मॉडेल 799 युआन (सुमारे 9,500 रुपये) आणि 6GB/128GB मॉडेल 899 युआन (सुमारे 10,720 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही. 

Web Title: Redmi 10A Launched With 5000mAh Battery 13MP Camera Check Price And Specs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.