Apple AirPods सारख्या डिजाईनसह Redmi Buds 3 लाँच; मिळणार 20 तासांचा बॅटरी बॅकअप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:31 PM2021-09-07T18:31:33+5:302021-09-07T18:31:55+5:30
Redmi Buds 3 Launch: Redmi Buds 3 चीनमध्ये 199 RMB (सुमारे 2,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आले आहेत. हे इयरबड्स सध्या चीनमध्ये क्राउडफंडिंगच्या माध्यमातून उपलब्ध आहेत.
Xiaomi ने चीनमध्ये आपले नवीन ट्रू वायरलेस (TWS) इयरबड्स Redmi Buds 3 लाँच केले आहेत. हे इयरबड्स Apple AirPods प्रमाणे सेमी इन इयर स्टायल डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. कंपनीने यात Qualcomm प्रोसेसर दिला आहे. तसेच क्लीयर व्हॉईस कॅप्चर (cVc) आणि अॅम्बिएन्ट साऊंड कमी करण्यासाठी नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी दिली आहे.
Redmi Buds 3 ची किंमत
Redmi Buds 3 चीनमध्ये 199 RMB (सुमारे 2,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आले आहेत. हे इयरबड्स सध्या चीनमध्ये क्राउडफंडिंगच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यांची इंट्रोडक्टरी किंमत 159 RMB (सुमारे 1,800 रुपये) आहे. या इयरबड्ससाठी 8 सप्टेंबरपासून क्राउडफंडिंग सुरु होईल.
Redmi Buds 3 चे फीचर्स
Redmi Buds 3 मध्ये शाओमीने 12mm चा मोठा ड्रायव्हर दिला आहे. तसेच यात Qualcomm QC3040 SoC मिळते. या इयरबड्समध्ये Qualcomm aptX Adaptive ऑडियो डिकोडिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, जी युजर्सना ब्लूटूथ द्वारे एचडी साउंड अनुभवण्यास मदत करते. Redmi Buds 3 मध्ये 95ms पर्यंतची लो लेटेंसी मिळते.
कॉलिंगच्या वेळी नॉइज कमी करण्यासाठी Redmi Buds 3 ड्युअल मायक्रोफोन Qualcomm’s cVc टेक्नॉलॉजीसह देण्यात आले आहेत. तसेच हे बड्स बिल्ट-इन टच कंट्रोलसह नियंत्रित करता येतात. या कंट्रोल्सचा वापर करून म्यूजिक प्ले-पॉज, ट्रॅक चेंज आणि कॉल पिकअप करता येतो. Redmi Buds 3 इयरबड्स सिंगल चार्जमध्ये सुमरे 5 तास वापरता येतात. परंतु चार्जिंग केसच्या मदतीने ही बॅटरी लाइफ 20 तासांवर जाऊ शकते.