64MP कॅमेऱ्यासह Redmi चा स्वस्त गेमिंग फोन होणार लाँच; वेगवान डिस्प्लेसह मिळणार शोल्डर बटन्स
By सिद्धेश जाधव | Published: December 14, 2021 12:45 PM2021-12-14T12:45:10+5:302021-12-14T12:45:45+5:30
Redmi K50 Pro Gaming: Redmi K50 Pro Gaming स्मार्टफोनमध्ये 64MP Sony Exmor IMX686 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याची जागा घेऊ शकतो.
Redmi आपल्या ‘के’ सीरीजवर काम करत आहे. लवकरच कंपनीची Redmi K50 लाईनअप बाजारात येईल. या सीरिजमधील Redmi K50 Pro Gaming edition ची माहिती Digital Chat Station नं दिली आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या फ्लॅगशिप प्रोसेसर, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, आणि 64MP रियर कॅमेरा सेन्सरसह बाजारात येईल.
Redmi K50 Pro Gaming चे लीक स्पेसिफिकेशन्स
टिपस्टरनुसार हा स्मार्टफोन हाय रिफ्रेश रेट ओएलईडी डिस्प्लेसह बाजारात येईल. ज्यात 120Hz किंवा 144Hz चा रिफ्रेश रेट मिळू शकतो. तसेच Redmi K50 Pro Gaming स्मार्टफोनमध्ये 64MP Sony Exmor IMX686 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याची जागा घेऊ शकतो. ओएलईडी डिस्प्लेमुळे Redmi K50 सीरीज इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शतके.
Redmi K50 Gaming हे नाव चीन पुरतं मर्यादित असू शकतं. हा स्मार्टफोन भारतासह जगभरात POCO F4 GT नावानं ओळखला जाईल. जुन्या POCO F3 GT मध्ये यात गेमिंगसाठी शोल्डर बटन मिळतील. तसेच यात गोरिल्ला ग्लास विक्टसचं संरक्षण मिळेल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित MIUI सह लाँच केला जाईल. हा फोन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये जागतिक बाजारात लाँच केला जाईल, अशी बातमी आली आहे.
हे देखील वाचा:
फक्त YouTube नव्हे तर ‘हे’ 5 सोशल मीडिया अॅप्स देखील देत आहेत कमाईची संधी
Realme X7 Max 5G: 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme चा 5G Phone; फोनमध्ये 12GB RAM आणि 64MP कॅमेरा