किंमत कमी पण प्रोसेसर दमदार; Redmi नं लाँच केले तीन ‘फ्लॅगशिप किलर’, वनप्लसची जागा जाणार?
By सिद्धेश जाधव | Published: March 19, 2022 12:41 PM2022-03-19T12:41:30+5:302022-03-19T12:56:08+5:30
Redmi K50 सीरीजमध्ये दोन तर एक Redmi K40s स्मार्टफोन सादर केला आहे. या फोन्समध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर देण्यात आले आहेत.
शाओमीच्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत अनेक नवीन प्रोडक्ट लाँच करण्यात आला आहेत. चीनमध्ये एका लाँच इव्हेंटमधून Redmi K50, Redmi K50 Pro आणि Redmi K40S स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. Redmi K50 आणि Redmi K50 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek चा फ्लॅगशिप चिपसेट आहे, तर Redmi K40S मध्ये Snapdragon 870 प्रोसेसर मिळतो, जो जुना फ्लॅगशिप प्रोसेसर आहे.
Redmi K50 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Redmi K50 Pro मध्ये 6.67-इंचाचा ओएलईडी 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. जो Dolby Vision, HDR10+, 120Hz रिफ्रेश रेट, 1200 निट्स पीक ब्राईट्नेस, DCI-P3 colour gamut आणि गोरिल्ला ग्लास विक्टसला सपोर्ट करतो. यात MediaTek चा Dimensity 9000 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागे 108MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप आणि समोर 20MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमधील 5000mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- Redmi K50 Pro 8GB/128GB: CNY 2,999 (जवळपास 36,000 रुपये)
- Redmi K50 Pro 8GB/256GB: CNY 3,299 (जवळपास 39,500 रुपये)
- Redmi K50 Pro 12GB/256GB: CNY 3,599 (जवळपास 43,000 रुपये)
- Redmi K50 Pro 12GB/512GB: CNY 3,999 (जवळपास 48,000) रुपये
Redmi K50 चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Redmi K50 मधील डिस्प्ले प्रो मॉडेलसारखा आहे. परंतु यात MediaTek च्या Dimensity 8100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या मागे 48MP + 8MP + 2MP असा कॅमेरा सेटअप आहे आणि समोर 20MP चा सेन्सर आहे. या रेडमी फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
- Redmi K50 8GB/128GB: CNY 2,399 (जवळपास 28,700 रुपये)
- Redmi K50 8GB/256GB: CNY 2,599 (जवळपास 31,000 रुपये)
- Redmi K50 12GB/256GB: CNY 2,799 (जवळपास 33,500 रुपये)
Redmi K40S चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Redmi K40S मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुलएचडी+ Samsung E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा Snapdragon 870 प्रोसेसर मिळतो. फोनच्या मागे 48MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप आहे आणि फ्रंटला 20MP चा सेल्फी शुटर आहे. पावर बॅकअपसाठी 67W फास्ट चार्जिंग असेलली 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
- Redmi K40S 6GB/128GB: CNY 1,799 (जवळपास 21,500 रुपये)
- Redmi K40S 8GB/128GB: CNY 1,999 (जवळपास 24,000 रुपये)
- Redmi K40S 8GB/256GB: CNY 2,199 (जवळपास 26,300 रुपये)
- Redmi K40S 12GB/256GB: CNY 2,399 (जवळपास 28,700 रुपये)