शाओमीची शक्तिशाली Redmi K50 सीरीज लवकरच येणार बाजारात; अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंटसह होऊ शकते लाँच
By सिद्धेश जाधव | Published: November 3, 2021 01:22 PM2021-11-03T13:22:02+5:302021-11-03T13:22:06+5:30
Xiaomi Redmi K50 Series Launch: शाओमी या सीरिजमध्ये Redmi K50, Redmi K50 Pro, आणि Redmi K50 Pro+ असे तीन मॉडेल सादर करू शकते.
शाओमी आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत किफायतशीर किंमतीत चांगले फीचर्स देत असते. खासकरून रेडमी के सीरिज तर फ्लॅगशिप लेव्हल फीचर्स मिडरेंजमध्ये सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता कंपनी आगामी Redmi K50 सीरीजवर काम करत आहे. लिक्सनुसार ही सीरिज यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये सादर केली जाईल.
ताज्या लीकनुसार Redmi K50 सीरीजमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. कंपनी या सीरिजमध्ये Redmi K50, Redmi K50 Pro, आणि Redmi K50 Pro+ असे तीन मॉडेल सादर करू शकते. जे सर्वप्रथम चीनमध्ये सादर केले जातील आणि त्यांनतर भारतासह जगभरात हे फोन उपलब्ध होतील.
टेक वेबसाईट MyDrivers ने Redmi K50 सीरीजमधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची माहिती दिली आहे. असा सेन्सर प्रथमच रेडमीच्या के सीरिजमध्ये दिसणार आहे. हा एक अॅडव्हान्स ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. त्यामुळे जुन्या इन-डिस्प्ले स्कॅनरच्या तुलनेत चांगली कामगीरी करेल.
Redmi K50 Series
लीक रिपोर्ट्सनुसार Redmi K50 सीरीज E5 AMOLED डिस्प्लेसह बाजारात येऊ शकते. तसेच Redmi K50 मध्ये 48-मेगापिक्सलचा, K50 प्रो मध्ये 50-मेगापिक्सलचा, तर Pro+ मॉडेलमध्ये 108-मेगापिक्सलचा सेन्सर मिळू शकतो. तसेच प्रो + व्हेरिएंट 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळेल आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये 100W फास्ट चार्जिंग स्पीड मिळू शकतो.
Redmi K50 सीरिजमधील एका फोनमध्ये Snapdragon 778G चिपसेट मिळू शकतो. हा बेस मॉडेल असण्याची शक्यता आहे. इतर काही रिपोर्ट्सनुसार, Redmi K50 आणि K50 Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 दिला जाऊ शकतो. तर Redmi K50 Pro+ स्मार्टफोन Snapdragon 898 चिपसेटसह बाजारात येईल.