120W सुपरफास्‍ट चार्जिंग, 108MP कॅमेरा असलेल्या नव्या रेडमी सीरीजचा झाला खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: November 6, 2021 07:00 PM2021-11-06T19:00:45+5:302021-11-06T19:01:07+5:30

Xiaomi Redmi K50 Series Launch: शाओमी आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत 108 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 67W फास्‍ट चार्जिंग असलेली नवीन सीरिज सादर करणार आहे.  

Redmi k50 series specifications leaked hinting 108 megapixel camera powerful snapdragon chipset 67w fast charging expected  | 120W सुपरफास्‍ट चार्जिंग, 108MP कॅमेरा असलेल्या नव्या रेडमी सीरीजचा झाला खुलासा 

120W सुपरफास्‍ट चार्जिंग, 108MP कॅमेरा असलेल्या नव्या रेडमी सीरीजचा झाला खुलासा 

Next

Redmi K50 सीरीज स्मार्टफोनचे प्रमुख स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. ही एक फ्लॅगशिप सीरिज असेल जी सर्वप्रथम चीनमध्ये आणि त्यानंतर जगभरात पदार्पण करेल. या सीरिजमध्ये 108 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 67W फास्‍ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. 2022 च्या सुरुवातीला येणाऱ्या लाईनअपमध्ये Redmi K50, Redmi K50 Pro आणि Redmi K50 Pro+ असे तीन फोन सादर केले जाऊ शकतात.  

टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशनने Weibo वर Xiaomi i11 सीरीज स्मार्टफोनचे प्रमुख स्पेसिफिकेशन पोस्ट केले आहेत. परंतु हे आगामी Redmi K50 स्मार्टफोनचे स्पेक्स असल्याची चर्चा आहे. या लीकनुसार या सीरीजमध्ये अनेक हँडसेट सादर ककेले जातील. जे हाय क्‍वॉलिटी स्‍क्रीन आणि स्नॅपड्रॅगन 8 सीरीजच्या चिपसेटसह येतील. फोटोग्राफीसाठी यात 108 मेगापिक्सलचा मेन सेन्सर मिळेल. तसेच यात 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी मिळणार आहे. Redmi K50 सीरीजच्या या फोन्‍समध्ये जेबीएलचे स्टीरियो स्पिकर आणि एक एक्स-अ‍ॅक्सिस मोटर मिळेल. हे स्पेसिफिकेशन्स हाय एन्ड Redmi K50 Pro आणि K50 Pro+ चे असू शकतात.  

Redmi K50 Series  

लीक रिपोर्ट्सनुसार Redmi K50 सीरीज E5 AMOLED डिस्प्लेसह बाजारात येऊ शकते. तसेच Redmi K50 मध्ये 48-मेगापिक्सलचा, K50 प्रो मध्ये 50-मेगापिक्सलचा, तर Pro+ मॉडेलमध्ये 108-मेगापिक्सलचा सेन्सर मिळू शकतो. तसेच प्रो + व्हेरिएंट 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळेल आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये 100W फास्ट चार्जिंग स्पीड मिळू शकतो.  

Redmi K50 सीरिजमधील एका फोनमध्ये Snapdragon 778G चिपसेट मिळू शकतो. हा बेस मॉडेल असण्याची शक्यता आहे. इतर काही रिपोर्ट्सनुसार, Redmi K50 आणि K50 Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 दिला जाऊ शकतो. तर Redmi K50 Pro+ स्मार्टफोन Snapdragon 898 चिपसेटसह बाजारात येईल. 

Web Title: Redmi k50 series specifications leaked hinting 108 megapixel camera powerful snapdragon chipset 67w fast charging expected 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.