फ्लॉवर नाही फायर निघाला Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन; फक्त 1 मिनिटांत लोकांनी संपवला कोट्यवधींचा स्टॉक
By सिद्धेश जाधव | Published: February 18, 2022 05:25 PM2022-02-18T17:25:11+5:302022-02-18T17:25:26+5:30
Redmi K50 Gaming Edition Sale: Redmi K50 Gaming Edition चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाला होता. फोन उपलब्ध होताच ग्राहक त्यावर तुटून पडले आणि स्टॉक संपवला.
काही दिवसांपूर्वी चीनमध्ये आलेला Redmi K50 गेमिंग एडिशन स्मार्टफोन आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेक्स लोकांना इतके आवडले कि फक्त एका मिनिटांत त्यांनी 280 मिलियन युआन अर्थात 330 कोटी रुपयांचा स्टॉक संपवला, अशी माहिती टेक वेबसाईट गिजमो चायनानं दिली आहे. चला जाणून घेऊया या विक्रमी विक्री करणाऱ्या Redmi K50 गेमिंग एडिशनची संपूर्ण माहिती.
Redmi K50 Gaming Edition चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश आणि 480Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतात. हा फोन डिस्प्लेमेट A+ रेटिंगसह येतो आणि सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी यातील 4700mAh ची बॅटरी वेगवान 120 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह मागे ट्रिपल सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. 12 जीबी पर्यंतचा वेगवान LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा फोन क्वॉलकॉमच्या नव्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये ड्यूल VC कूलिंग देण्यात आली आहे.
Redmi K50 Gaming Edition ची किंमत
Redmi K50 Gaming Edition चे दोन व्हेरिएंट बाजारात दाखल झाले आहेत. या फोनच्या छोट्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 3,299 युआन (सुमारे 38,900 रुपये) आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी 3,599 युआन (सुमारे 42,400 रुपये) मोजावे लागतील.
हे देखील वाचा:
- फ्रिजमध्ये Smartphone लवकर होतो Charge? पाहा वनप्लसच्या फोनवर करण्यात आलेला अनोखा प्रयोग
- दिवसभर टिकेल या स्वस्त Vivo स्मार्टफोनची बॅटरी; फक्त ‘इतकी’ हे किंमत; जाणून घ्या फीचर्स