Redmi K50i ची नाव बदलून होऊ शकते भारतात एंट्री; स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2022 05:58 PM2022-06-22T17:58:14+5:302022-06-22T17:58:27+5:30

Redmi K50i च्या खास स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे.  

Redmi k50i rebranded model redmi note 11t pro come with 64mp camera 8gb ram may launch in india   | Redmi K50i ची नाव बदलून होऊ शकते भारतात एंट्री; स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा 

Redmi K50i ची नाव बदलून होऊ शकते भारतात एंट्री; स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा 

googlenewsNext

Redmi Note 11T Pro आणि Redmi Note 11T Pro+ स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. यातील प्रो मॉडेल भारतात Redmi K50i नावानं दाखल होऊ शकतो, अशी माहिती आता समोर आली आहे. तसेच फोनच्या खास स्पेसिफिकेशनचा देखील खुलासा झाला आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट मात्र अजून समोर आली नाही.  

या स्पेसिफिकेशन्ससह Redmi K50i येऊ शकतो 

91Mobiles नं टिपस्टर Ishan Agarwal च्या हवाल्याने आगामी रेडमी फोनची माहिती दिली आहे. त्यानुसार या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले मिळेल. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राईटनेस 650 Nits असेल. हा फोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो. तसेच यात 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असेल. 8GB RAM व 128GB स्टोरेज देखील बाजारात येईल.  

फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 5080mAh ची बॅटरी मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा तिसरा सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनमध्ये स्टीरियो स्पिकर, Dolby Atmos, फ्लॅट फ्रेम आणि हेडफोन जॅक मिळेल. फोन MIUI 13 कस्टम युआयवर चालेल. सध्या तरी इतकीच माहिती समोर आली आहे.  

Web Title: Redmi k50i rebranded model redmi note 11t pro come with 64mp camera 8gb ram may launch in india  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.