जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह Redmi Note 10 Lite भारतात सादर; जाणून घ्या स्वस्त Xiaomi फोनची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: October 1, 2021 01:14 PM2021-10-01T13:14:04+5:302021-10-01T13:14:38+5:30
Budget Xiaomi Phone Redmi Note 10 Lite Price: Xiaomi Redmi Note 10 Lite चे तीन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. हा फोन mi.com आणि Amazon वरून विकत घेता येईल.
शाओमीने आपल्या Redmi Note 10 सीरीजमध्ये एक स्वस्त स्मार्टफोन जोडला आहे. कंपनीने हा फोन Redmi Note 10 Lite नावाने सादर केला आहे. याआधी या सीरिजमध्ये कंपनीने Redmi Note 10, Note 10 Pro, Note 10 Pro Max, Note 10S, आणि Note 10T असे पाच डिवाइस सादर केले आहेत. नवीन Note 10 Lite जुन्या Redmi Note 9 Pro स्मार्टफोनचे रीब्रँडेड व्हर्जन आहे.
Redmi Note 10 Lite ची किंमत
- 4GB RAM + 64GB: 13,999 रुपये
- 6GB RAM + 64GB: 15,999 रुपये
- 6GB RAM + 128GB: 16,999 रुपये
हा फोन चार कलर ऑप्शनमध्ये 2 ऑक्टोबरपासून Mi.com आणि अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Redmi Note 10 चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 10 Lite मध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080x2400 रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योसह सादर करण्यात आला आहे. ज्याला गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या फोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 720G ऑक्टा-कोर चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल.
नोट 10 लाईट अँड्रॉइड 10 वर आधारित एमआईयुआय 11 चालतो. कनेक्टिव्हीटीसाठी 4जी वीओएलटीई, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि आयआर ब्लास्टर असे फिचर मिळतात. सिक्योरिटीसाठी एआय फेस अनलॉक आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या चौथ्या सेन्सर असेल. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi Note 10 Lite मधील 5,020mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते.