जबरदस्त फीचर्स असलेले टॉप ५ स्मार्टफोन्स; किंमत आहे २० हजारांपेक्षाही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:19 PM2021-04-05T15:19:21+5:302021-04-05T15:25:50+5:30
पाहा कोणते आहेत हे Smartphones, पाहा लिस्ट
15 ते 20 हजार रुपयांचा स्मार्टफोन सेगमेंट खूप लोकप्रिय आहे. मोठ्या संख्येने ग्राहक या किंमतीच्या सेगमेंटमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असतात. परंतु कंपन्यांकडून सातत्यानं नवीन फोन लाँच केल्यामुळे, योग्य फोन निवडणे थोडे अवघड होते. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक स्मार्टफोन्स आणले आहेत. आपण असे काही स्मार्टफोन्स पाहणार आहोत जे उत्तमही आहेत आणि ज्याची किंमत 20 हजार रूपयांपेक्षाही कमी आहे.
Realme Narzo 30 Pro
हा सध्या देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. याच्या 6 जीबी रॅम आणि 64 स्टोरेज मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. यात 120hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्शन 800 यू प्रोसेसर, 48 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रन्ट कॅमेरा आणि 5000 एमएएच बॅटरीसह 6.50 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
Redmi Note 10 Pro Max
रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन नुकताच लाँच झाला आहे. त्याच्या 6 जीबी रॅम आणि 64 स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे. यात 6.67 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर, 108 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 5 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 एमपी फ्रंट कॅमेरा आणि 5020 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy M31s
या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी बॅटरी. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 6.5 इंचाचा पंच-होल डिस्प्ले, सॅमसंग एक्सिनोस 9611 प्रोसेसर, 64 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल + 5 मेगापिक्सेल + 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Poco X3 Pro
या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जबरदस्त कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर. या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 स्टोरेज मॉडेल्सची किंमत 18,999 रुपये आहे. यात 6.67 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर, 48 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 5160mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo V20 SE
सेल्फीच्या चाहत्यांसाठी हा स्मार्टफोन खास आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 स्टोरेज मॉडेलची किंमत 19,990 रुपये आहे. यात 6.44 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर, 48 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 4100mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.