शाओमीच्या स्वस्त 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आज; इथून विकत घ्या हा दमदार स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: July 26, 2021 12:02 PM2021-07-26T12:02:45+5:302021-07-26T12:03:39+5:30

Redmi Note 10t 5G First Sale: शाओमीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. हा रेडमी सीरिजमधील पहिला 5जी स्मार्टफोन आहे.  

Redmi note 10t 5g first sale will start today from 12pm check price specs and offer  | शाओमीच्या स्वस्त 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आज; इथून विकत घ्या हा दमदार स्मार्टफोन 

Redmi Note 10T 5G स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे

Next

Redmi Note 10T 5G 26 जुलै म्हणजे आज दुपारी 12 वाजल्यापासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा कंपनीच्या स्वस्त रेडमी सीरिजमध्ये लाँच झालेला पहिला 5G स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 90Hz रिफ्रेश रेट असे दमदार फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट आणि चार कलर ऑप्शनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

Redmi Note 10T 5G ची किंमत  

Redmi Note 10T 5G स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. Redmi Note 10T 5G स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून ऑफलाईन स्टोर्स, मी.कॉम, मी होम आणि अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. हा फोन HDFC बँकेच्या कार्डने विकत घेतल्यास डिस्काउंट मिळेल. तसेच हा फोन एक्सचेंज ऑफरसह देखील विकत घेता येईल. 

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या रेडमी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह Mali-G57 GPU देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 आधारित MIUI वर चालणारा हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.   

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10टी 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.  

5जी कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो. Redmi Note 10T 5G मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळते, ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. एकदा चार्ज केल्यावर हा फोन दोन दिवस चालेल, असा कंपनीने दावा केला आहे. 

Web Title: Redmi note 10t 5g first sale will start today from 12pm check price specs and offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.