रेडमी सिरीजमधील पहिल्या 5G फोनच्या भारतीय लाँचची ठरली तारीख; या तारखेला Redmi Note 10T 5G होणार लाँच
By सिद्धेश जाधव | Published: July 12, 2021 02:33 PM2021-07-12T14:33:07+5:302021-07-12T14:38:35+5:30
Redmi Note 10T 5G Launch Date: Xiaomi च्या आगामी Redmi Note 10T 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती कंपनीने अमेझॉनवर शेयर केलेल्या पोस्टरवरून मिळाली आहे.
Redmi Note 10T 5G भारतात येणार असल्याची माहिती कंपनीने काही दिवसांपूर्वी सांगितली होती. आता कंपनीने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन 20 जुलैला भारतात लाँच होईल. हा फोन Redmi Note 10 5G चा रिब्रँड व्हर्जन आहे, अशी चर्चा आहे. हा रेडमी फोन MediaTek Dimensity 700 चिपसेट, ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो.
Xiaomi च्या आगामी Redmi Note 10T 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती कंपनीने अमेझॉनवर शेयर केलेल्या पोस्टरवरून मिळाली आहे. या स्मार्टफोनचे प्रॉडक्ट पेज अमेझॉनवर बनवण्यात आले आहे त्यामुळे Redmi Note 10T 5G अमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल हे निश्चित झाले आहे.
Redmi Note 10T 5G ची किंमत
Redmi Note 10T 5G चा एकमेव 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट रशियात 19,990 रुबल (अंदाजे 20,600 रुपये) की किंमतीत सादर केला गेला आहे. रेडमी का हा फोन ग्रीन, सिल्वर, ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.
Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 10T 5G मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात येईल. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये प्राइमरी कॅमेरा 48MP चा आहे. त्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.