Redmi Note 11 4G: नव्या प्रोसेसरसह येतोय Redmi चा स्वस्त फोन; 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह घेता येणार विकत
By सिद्धेश जाधव | Published: December 14, 2021 08:09 PM2021-12-14T20:09:46+5:302021-12-14T20:10:50+5:30
Redmi Note 11 4G स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारात येणार आहे. चीनमध्ये आलेला हा फोन नव्या प्रोसेसरसह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाईल.
शाओमीनं काही दिवसांपूर्वी चीनमध्ये आपला Redmi Note 11 4G स्मार्टफोन सादर केला होता. आता या फोनच्या जागतिक लाँचच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. रिपोर्ट्नुसार कंपनी Redmi Note 11 4G स्मार्टफोन लवकरच भारतसह जागतिक बाजारात नव्या चिपसेटसह लाँच करू शकते. चीनमध्ये मीडियाटेक प्रोसेसरसह आलेला हा फोन बाहेत स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येईल.
Redmi Note 11 4G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11 4G मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एलसीडी डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशन, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला मीडियाटेक Snapdragon 680 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल. 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजसह येणारा रेडमी फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.
फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. Redmi Note 11 4G मधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये 3.5एमएम जॅक, आयआर ब्लास्टर आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या डिवाइसमधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग आणि 9वॉट रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत
Redmi Note 11 4G स्मार्टफोनचा 4GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल ग्लोबल मार्केटमध्ये 199 डॉलर (सुमारे 15,000 रुपये) असू शकते. हा फोन ग्रॅफाइट ग्रे, स्टार ब्लू आणि ट्विलाईट ब्लू रंगात सादर केला जाईल.
हे देखील वाचा :
रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टवॉच; आधीच देतील आजारांची सूचना
Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा