Redmi चा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार! लॉन्च होण्याआधीच लीक झाला लूक, डिझाइन अन् फिचर्स, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:34 PM2022-01-20T18:34:06+5:302022-01-20T18:37:06+5:30
Xiaomi कंपनी येत्या २६ जानेवारी रोजी Redmi Note 11 सीरीज फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खुद्द कंपनीकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली-
Xiaomi कंपनी येत्या २६ जानेवारी रोजी Redmi Note 11 सीरीज फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खुद्द कंपनीकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. पण या सीरीजमध्ये नेमका कोणता स्मार्टफोन सर्वात आधी बाजारात येणार याबाबत अध्याप कोणतीही माहिती कंपनीनं दिलेली नाही. रिटेल लिस्टिंगनं वेनिला व्हेरिअंटबाबत सर्व माहिती आता उघड केली आहे.
Redmi Note 11 मध्ये 50MP चा जबरदस्त कॅमेरा, 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि ड्युअल स्टिरिओ स्पीकर असणार आहेत. Redmi Note 11 ची किंमत (Redmi Note 11 Price In India) आणि फिचर्स काय असतील हे जाणून घेऊयात...
Redmi Note 11 Price
बेसलाइन Redmi Note 11 ला रिटेलर शॉपीद्वारे त्यांच्या वेबसाइटवर 4GB + 64GB व्हेरिअंटसाठी १७५ डॉलर (जवळपास १३,०४० रुपये) प्राइज टॅगसाठी लिस्टेड करण्यात आलं आहे. TechInsider च्या माहितीनुसार, ट्विटर यूझर @swayneverrmind नं स्मार्टफोनचा लूक आणि फिचर्सबाबतचं लीक एका वेबपेजवर करण्यात आलं आहे.
Redmi Note 11 Expected Specifications
वेबपेजवर लीक करण्यात आलेल्या माहितीनुसार वेनिला Redmi Note 11 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आलं आहे. फोन 90Hz FHD + AMOLED डिस्प्ले, डुअल स्टिरिओ स्पीकर आणि एक 50MP क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. यात अल्ट्रा-वाइड युनिट आणि एक मॅक्रो शूटर असणार आहे. याशिवाय 33W फास्ट चार्जिंगसह फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची जबरदस्त बॅटरी असण्याची शक्यता आहे.