108MP कॅमेरा असलेले Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ लवकरच येणार भारतात; लाँचची माहिती लीक  

By सिद्धेश जाधव | Published: October 29, 2021 01:04 PM2021-10-29T13:04:46+5:302021-10-29T13:05:29+5:30

Xiaomi Redmi Note 11 Pro and Redmi Note 11 Pro Plus India Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोनचे भारतीय व्हेरिएंट TUV Rheinland certification वर लिस्ट करण्यात आले आहेत.

Redmi note 11 pro and redmi note 11 pro plus indian variants certified launch soon  | 108MP कॅमेरा असलेले Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ लवकरच येणार भारतात; लाँचची माहिती लीक  

108MP कॅमेरा असलेले Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ लवकरच येणार भारतात; लाँचची माहिती लीक  

Next

गेले कित्येक दिवस चर्चेत राहिलेली शाओमीची Redmi Note 11 series काल चीनमध्ये सादर झाली. या सीरिजमध्ये कंपनीने Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. जागतिक बाजारात वर्णी लावल्यानंतर आता या फोन्सच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु झाली आहे.  

Redmi note 11 India Launch Date 

टिपस्टर मुकुल शर्माने Redmi Note 10 सीरीजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. या सीरिजमधील Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोनचे भारतीय व्हेरिएंट TUV Rheinland certification वर लिस्ट करण्यात आले आहेत. तसेच हे फोन 21091116I आणि 21091116UC या मॉडेल नंबर्ससह बीआयएस या भारतीय सर्टिफिकेशन साईटवर देखील दिसले आहेत. याच मॉडेल नंबरची माहिती आयएमईआय डेटाबेसवरून देखील मिळाली आहे. त्यामुळे लवकरच हे फोन्स भारतीय बाजारात दाखल होतील, असे सांगण्यात आले आहे.  

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स  

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ या दोन्ही फोन्सचे बहुतांश स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. फक्त Redmi Note 11 Pro+ मधील 4500mAh ची बॅटरी 120W fast charging सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. तर Redmi Note 11 Pro मधील 5000mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही फोन्समध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि पंच होल डिजाईनसह आला आहे. दोन्ही रेडमी फोन्समध्ये ऑक्टकोर मीडियाटेक डिमेंसीटी 920 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. दोन्ही फोन्समध्ये ड्युअल सिमेट्रिक JBL-ट्यून स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. जे डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि हाय-रेज ऑडिओला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी या फोन्समध्ये NFC, GPS, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळतो. हे दोन्ही फोन IP53 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह सादर झाले आहेत. तसेच यात VC लिक्विड कुलिंग देण्यात आली आहे. 

Web Title: Redmi note 11 pro and redmi note 11 pro plus indian variants certified launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.