Xiaomi Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, लाँचसाठी उरले फक्त काही दिवस
By सिद्धेश जाधव | Published: October 25, 2021 03:09 PM2021-10-25T15:09:34+5:302021-10-25T19:44:25+5:30
Xiaomi Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपल्बध झाले आहेत. 28 ऑक्टोबरला ही सीरिज लाँच केली जाईल.
शाओमीच्या लोकप्रिय नोट सीरिजची पुढची पिढी लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. गेले कित्येक दिवस Xiaomi Redmi Note 11 सीरीजच्या बातम्यांचा महापूर टेक विश्वात आला आहे. त्यात अजून एका बातमीची भर झाली आहे. आगामी Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ हे स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत. चीनमध्ये हे फोन ई-कॉमर्स साईट JD.com वरून प्री-ऑर्डर करता येतील.
Xiaomi Redmi Note 11 सीरिज 28 ऑक्टोबरला चीनमध्ये सादर केली जाणार आहे. चीनमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी ही सीरिज जागतिक बाजारात पाऊल टाकेल. तत्पूर्वी ही सीरिज होम मार्केट चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहे. JD.com वर Redmi Note 11 Pro स्मार्टफोन 100 युआन (सुमारे 1,174 रुपये) आणि प्रो प्लस व्हेरिएंट 200 युआन (सुमारे 2,349 रुपये) मध्ये बुक करता येईल.
Xiaomi Redmi Note 11 सीरिजचे स्पेक्स
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Redmi Note 11 सीरीजमध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, आणि Redmi Note 11 Pro+ असे तीन स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. कंपनीने या सीरिजमध्ये 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कदाचित हायएंड Pro+ मॉडेलमध्ये ही फास्ट चार्जिंग मिळू शकते.
Redmi Note 11 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 50MP चा मेन रियर कॅमेरा आणि 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. हा शाओमी फोन मीडियाटेकच्या Dimensity 810 चिपसेटसह सादर केला जाईल. Redmi Note 11 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग दिली जाईल.
Redmi Note 11 Pro स्मार्टफोनला MediaTek Dimensity 920 SoC ची ताकद दिली जाऊ शकतो. तसेच 8GB पर्यंतचा RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. या डिवाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. पॉवरबॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी 67W किंवा 120W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते.
Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह Samsung AMOLED डिस्प्ले दिली जाईल. हा फोन MediaTek Dimensity 1200 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. 108MP + 8MP + 2MP असा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.