108MP कॅमेरा असलेल्या भन्नाट Redmi फोनवर मिळतोय 3000 रुपयांचा डिस्काउंट; आज आहे पहिला सेल 

By सिद्धेश जाधव | Published: March 15, 2022 12:04 PM2022-03-15T12:04:27+5:302022-03-15T12:04:38+5:30

Redmi Note 11 Pro Plus 5G Price In India: Redmi Note 11 Pro Plus 5G हा स्मार्टफोन देशात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे.

Redmi Note 11 Pro Plus 5G Sale In India On Amazon Know Price And Specifications  | 108MP कॅमेरा असलेल्या भन्नाट Redmi फोनवर मिळतोय 3000 रुपयांचा डिस्काउंट; आज आहे पहिला सेल 

108MP कॅमेरा असलेल्या भन्नाट Redmi फोनवर मिळतोय 3000 रुपयांचा डिस्काउंट; आज आहे पहिला सेल 

Next

Redmi Note 11 Pro Plus 5G Price In India: Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत गेल्या आठवड्यात दोन नवीन स्मार्टफोन Redmi Note 11 Pro+ 5G आणि Redmi Note 11 Pro लाँच झाले आहेत. यातील रेडमी नोट 11 प्रो+ स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. हा स्मार्टफोन देशात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. पहिल्याच सेलमध्ये फोनवर डिस्काउंटही मिळत आहे.  

Redmi Note 11 Pro Plus 5G ची किंमत आणि ऑफर्स  

Redmi Note 11 Pro Plus 5G स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये आहे. तर तिसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

हा स्मार्टफोन Amazon, Mi.com आणि ऑफलाइन Mi होम स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच लॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत जुना Redmi फोन एक्सचेंज केल्यास 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

Redmi Note 11 Pro Plus 5G स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डॉट नॉच डिजाईनसह आलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 13 वर चालतो. कंपनीनं यात Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट देण्यात आला आहे. या फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल. 

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 67W का फास्ट चार्जर देण्यात आला आहे. 

हे देखील वाचा:

 

Web Title: Redmi Note 11 Pro Plus 5G Sale In India On Amazon Know Price And Specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.