108MP कॅमेरा व 8GB रॅम असलेल्या स्वस्त फोनची किंमत समजली; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये?

By सिद्धेश जाधव | Published: March 3, 2022 01:27 PM2022-03-03T13:27:49+5:302022-03-04T17:38:27+5:30

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ 5G दोन्ही फोन 9 मार्च दुपारी 12 वाजता भारतात 67W Charging, 108MP Camera आणि 120Hz Display सह सादर केले जातील.  

Redmi Note 11 Pro series India Price leak before 9 march launch  | 108MP कॅमेरा व 8GB रॅम असलेल्या स्वस्त फोनची किंमत समजली; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये?

108MP कॅमेरा व 8GB रॅम असलेल्या स्वस्त फोनची किंमत समजली; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये?

googlenewsNext

Xiaomi येत्या 9 मार्चला भारतात आपले दोन नवीन मोबाईल सादर करणार आहे. लाँचसाठी फक्त एक आठवडा उरला असताना Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ 5G ची किंमत लीक झाली आहे. हे दोन्ही फोन्स दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात येतील. ज्यात 6GB/128GB व 8GB/128GB मॉडेल्सचा समावेश असेल. दोन्ही फोन 9 मार्च दुपारी 12 वाजता भारतात 67W Charging, 108MP Camera आणि 120Hz Display सह सादर केले जातील.  

Redmi Note 11 Pro सीरिजची लीक किंमत 

Redmi Note 11 Pro 4G च्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये असू शकते. तर 8 जीबी रॅम व्हेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या मोबाईलचे Sky Blue, Phantom White आणि Stealth Black कलर बाजारात उपलब्ध होतील.  

Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये भारतीयांचा भेटीला येईल. तर 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये असू शकते. कंपनी या डिवाइसचे Mirage Blue, Phantom White आणि Stealth Black कलर भारतात सादर करू शकते.  

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स 

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ या दोन्ही फोन्सचे बहुतांश स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. फक्त Redmi Note 11 Pro+ मधील 4500mAh ची बॅटरी 120W fast charging सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. तर Redmi Note 11 Pro मधील 5000mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

दोन्ही फोन्समध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि पंच होल डिजाईनसह आला आहे. दोन्ही रेडमी फोन्समध्ये ऑक्टकोर मीडियाटेक डिमेंसीटी 920 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. दोन्ही फोन्समध्ये ड्युअल सिमेट्रिक JBL-ट्यून स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. जे डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि हाय-रेज ऑडिओला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी या फोन्समध्ये NFC, GPS, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळतो. हे दोन्ही फोन IP53 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह सादर झाले आहेत. तसेच यात VC लिक्विड कुलिंग देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

 

Web Title: Redmi Note 11 Pro series India Price leak before 9 march launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.