काही मिनिटांतच OUT OF STOCK झाला शाओमीचा रेडमी नोट 5
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 04:28 PM2018-02-22T16:28:05+5:302018-02-22T16:33:13+5:30
शाओमी कंपनीने गेल्या आठवड्यात बहुप्रतिक्षित रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. आज या दोन्ही फोनचा ऑनलाइन सेल ठेवण्यात आला होता.
शाओमी कंपनीने गेल्या आठवड्यात बहुप्रतिक्षित रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. आज या दोन्ही फोनचा ऑनलाइन सेल ठेवण्यात आला होता. पण अवघ्या काही मिनिटांमध्येच दोन्ही फोनचे सर्व मॉडेल आउट ऑफ स्टॉक झाले. आज दुपारी 12 वाजता Flipkart.com आणि Mi.com वर या फोनचा सेल ठेवण्यात आला होता. 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता पुढील सेल ठेवण्यात आला आहे. या दोन्ही फोनवर जिओकडून 2 हजार 200 रूपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे.
रेडमी नोट 5 - शाओमीचा 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज असलेला रेडमी नोट 5 ग्राहकांना 9,999 रूपयांना उपलब्ध आहे. तर 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजचा फोन ग्राहकांना 11,999 रूपयांना मिळणार आहे. रोज गोल्ड, गोल्ड, ब्लू व ब्लॅक अशा चार रंगामध्ये हे फोन उपलब्ध आहेत. रेडमी नोट 5मध्ये 5.99 इंच आकारमानाचा व 18 बाय 9 पिक्सल्स (एचडी प्लस) क्षमतेचा डिस्प्ले आहे. मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे.. या मॉडेलमध्ये 3 आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत . यातील रेडमी नोट 5 या मॉडेलमध्ये 12 व 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे तर 4000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फ्रंट फ्रॅशही आहे.
रेडमी नोट 5 प्रो - शाओमीने रेडमी नोट 5 प्रो या मोबाइलचंही अनावरण केलं. रेडमी नोट 5 प्रोच्या 4 जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत 13 हजार 999 आहे. तर 6 जीबी रॅम असणारा फोन 16 हजार 999 रूपयांना मिळतो आहे. रेडमी नोट 5 प्रमाणे रेडमी नोट 5 प्रो या फोनलाही फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. या मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर बसविण्याक आला आहे. मोबाइलला 12 व 5 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा तर 20 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.