Redmi Smart Band Pro लवकरच येतोय भारतात; Xiaomi चा अधिकृत पोस्टर आला समोर 

By सिद्धेश जाधव | Published: November 16, 2021 12:37 PM2021-11-16T12:37:23+5:302021-11-16T12:37:53+5:30

Xiaomi Redmi Band Pro Price In India: Redmi Smart Band Pro भारतात 30 नोव्हेंबर रोजी सादर केला जाऊ शकतो. हा फिटनेस बँड याआधी युरोपात सादर करण्यात आला आहे.

Redmi smart band pro launch soon in india  | Redmi Smart Band Pro लवकरच येतोय भारतात; Xiaomi चा अधिकृत पोस्टर आला समोर 

Redmi Smart Band Pro लवकरच येतोय भारतात; Xiaomi चा अधिकृत पोस्टर आला समोर 

Next

Xiaomi येत्या 30 नोव्हेंबरला भारतात आपल्या बहुप्रतीक्षित Redmi Note 11 सीरिज अंतर्गत रेडमी नोट 11T सादर करणार आहे. परंतु या इव्हेंटमधून हा एकच डिवाइस भारतीयांच्या भेटीला येणार नाही. कंपनी जागतिक बाजारात आलेला Redmi Smart Band Pro देखील देशात लाँच होणार आहे. हा फिटनेस बँड युरोपमध्ये 59 यूरो (सुमारे 5,000 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला होता. हा बँड Redmi Smart Band ची जागा घेईल.  

लाँच होण्याआधीच Redmi Smart Band Pro शाओमीच्या आगामी Redmi Accessories Bonanza सेलच्या पोस्टरमध्ये दिसला आहे. पोस्टरनुसार, हा सेल रेडमीच्या वेबसाईटवर 13 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. या पोस्टरवरून Redmi Smart Band Pro चा भारतीय लाँच निश्चित झाला आहे.  

Redmi Smart Band Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Smart Band Pro याआधी जागतिक बाजारात उतरल्यामुळे या बँडचे स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या फिटनेस बँडमध्ये 1.47-इंचाचा AMOLED टच डिस्प्ले देण्यात येईल. जो 194×368 पिक्सल रिजोल्यूशन आणि 450 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यातील 200mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते. पॉवर सेविंग मोडच्या मदतीने 20 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ वाढवता येते.  

Redmi Smart Band Pro मध्ये 6-अ‍ॅक्सिस सेन्सर, PPG हार्ट रेट सेन्सर आणि लाईट सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच हा बँड 5ATM सर्टिफिकेशन, Bluetooth v5 आणि Apollo 3.5 प्रोसेसरसह देण्यात आला आहे. यात हार्ट रेट मॉनीटरिंग, SpO2 मॉनीटरिंग आणि स्लीप क्वालिटी ट्रॅकिंग असे हेल्थ फीचर्स मिळतात. त्याचबरोबर आउटडोर रनिंग, सायकलिंग, ट्रेडमिल, HIIT, जम्पिंग रोप, रोविंग, ब्रिथिंग एक्सरसाइज, मेनुस्ट्रल सायकल ट्रॅकिंग असे मोड देखील देण्यात आले आहेत.  

Web Title: Redmi smart band pro launch soon in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.