शाओमीचा नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात सादर; या स्पेसीफाकेशन्ससह Redmi Smart TV घेता येणार विकत 

By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 02:51 PM2021-09-22T14:51:38+5:302021-09-22T14:56:32+5:30

Xiaomi Redmi Smart TV price: Xiaomi आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत नवीन स्मार्ट टीव्ही भारतात सादर केला आहे. कंपनीने Redmi Smart TV चे 32 इंच आणि 43 इंच असे दोन मॉडेल लाँच केले आहेत.  

Redmi smart tv 2021 32 and 43 inch model launched in india  | शाओमीचा नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात सादर; या स्पेसीफाकेशन्ससह Redmi Smart TV घेता येणार विकत 

Redmi Smart TV मध्ये Google Chromecast आणि गुगल असिस्टंट बिल्ट-इन देण्यात आला आहे.

Next
ठळक मुद्देRedmi Smart TV चा 32 इंचाचा मॉडेल 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. नवीन रेडमी स्मार्ट टीव्ही नव्या Mi Remote सह बाजारात येतील

ठरल्याप्रमाणे Redmi ब्रँडने आपला नवीन स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात सादर केला आहे. Redmi Smart TV 32 इंच आणि 43 इंच अश्या दोन साईजमध्ये विकत घेता येईल. यात Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टमसह कंपनीचा नवीन पॅचवेल ओएस देण्यात आला आहे. तसेच या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये Dolby ऑडियो, IMDb इंटिग्रेशन आणि गुगल व्हॉइस असिस्टंस फीचर दिले आहे.  

Redmi Smart TV चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

दोन्ही मॉडेल HD डिस्प्ले पॅनलसह येतात जो 16 मिलियन कलर सपोर्ट आणि Xiaomi Vivid Picture Engine सह सादर करण्यात आला आहे. यातील 20W चे स्पिकर्स Dolby ऑडियोला सपोर्ट करतात, तसेच यात DTS व्हर्च्युअल X साउंड सपोर्ट देखील मिळतो. Redmi Smart TV मध्ये Google Chromecast आणि गुगल असिस्टंट बिल्ट-इन देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही Android TV 11 आधारित PatchWall 4 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तसेच IMDb इंटिग्रेशन, यूनिवर्सल सर्च, किड्स मोड आणि लँग्वेज यूनिवर्स सारखे फीचर्स मिळतात.  

नवीन रेडमी स्मार्ट टीव्ही नव्या Mi Remote सह बाजारात येतील, ज्यात डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटण मिळेल. तसेच रिमोटमध्ये Quick Mute आणि Quick Wake सारखे फीचर्स आहेत. कनेक्टिविटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.0, दोन HDMI पोर्ट, दोन USB 2.0 पोर्ट, एक 3.5mm ऑडियो जॅक, LAN केबल जॅक आणि एक अँटीना पोर्ट देण्यात आला आहे. गेमिंगसाठी टीव्हीमध्ये लो लेटन्सी मोड मिळतो.  

Redmi Smart TV ची किंमत 

Redmi Smart TV चा 32 इंचाचा मॉडेल 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 43 इंचाच्या टीव्हीसाठी 25,999 रुपये मोजावे लागतील. हा स्मार्ट टीव्ही Amazon India, Mi.com, Mi Home Store सह ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्ट टीव्हीचा पहिला सेल Amazon Great Indian Festival Sale च्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. 

Web Title: Redmi smart tv 2021 32 and 43 inch model launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.