Smart TV: Redmi चा 43 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही येतोय; कमी किंमतीत घालणार धुमाकूळ  

By सिद्धेश जाधव | Published: January 28, 2022 08:00 PM2022-01-28T20:00:23+5:302022-01-28T20:00:38+5:30

Redmi 4K Smart TV: कंपनी भारतात Redmi Smart TV X43 लाँच करू शकते. हा 43-इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही असेल.

Redmi Smart Tv X43 4k Smart Tv To Be Launched In India On February 9 | Smart TV: Redmi चा 43 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही येतोय; कमी किंमतीत घालणार धुमाकूळ  

Smart TV: Redmi चा 43 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही येतोय; कमी किंमतीत घालणार धुमाकूळ  

googlenewsNext

Xiaomi भारतात एकाच वेळी अनेक प्रोडक्ट्स सादर करण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीनं येत्या 9 फेब्रुवारीला मेगा लाँच इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमधून Redmi Note 11 सीरीजचे स्मार्टफोन आणि Redmi Smart Band Pro फिटनेस बँड सादर करण्यात येईल. आता कंपनीनं Redmi TV सीरीजच्या नव्या स्मार्ट टीव्हीच्या लाँचची देखील घोषणा केली आहे.  

कंपनी भारतात Redmi Smart TV X43 लाँच करू शकते. हा 43-इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही असेल. याआधी Redmi Smart TV X सीरीजमध्ये Redmi Smart TV X65, X55, आणि X50 असे तीन मॉडेल भारतात आले आहेत. आता 9 फेब्रुवारीला सीरिजमध्ये चौथा मॉडेल जोडण्यात येईल.  

Redmi Smart TV X43 

Redmi Smart TV X43 स्मार्टटीव्ही 4K डिस्प्लेसह सादर करण्यात येईल. जो 4K HDR आणि Dolby Vision कंटेंटला सपोर्ट करेल. सध्या बाजारात असलेल्या 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये हे फिचर मिळत नाही. तसेच या टीव्ही मध्ये 30W चा स्पिकर सेटअप मिळेल. जो Dolby Audio सपोर्टसह सादर करण्यात येईल.  

आगामी रेडमी स्मार्ट टीव्ही क्वॉड कोर CPU सह बाजारात येईल. सोबत 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज देण्यात येईल. हा टीव्ही अँड्रॉइड आधारित PatchWall UI सह सादर केला जाऊ शकतो,. यात IMDB आणि Google Play इंटीग्रेटेड असतील. आगामी Redmi Smart TV X43 स्मार्ट टीव्ही Amazon, Mi.com आणि Mi स्टोरवरून विकत घेता येईल. 

हे देखील वाचा:

7 हजारांच्या डिस्काउंटसह Realme चा फाडू फोन; हँडसेटमध्ये 12GB RAM आणि 64MP चा शानदार कॅमेरा

सावधान! तुमच्या Android Phone च्या सुरक्षेसाठी हे 5 सिक्योरिटी चेक्स आहेत अत्यंत महत्वाचे; त्वरित जाणून घ्या

Web Title: Redmi Smart Tv X43 4k Smart Tv To Be Launched In India On February 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.