गेम खेळताना अचानक फुटला Redmi चा फोन; तुम्ही करत नाही ना 'ही' चूक अन्यथा होईल नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:07 PM2022-12-13T17:07:39+5:302022-12-13T17:11:46+5:30
व्हिडीओ गेम खेळताना मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक 13 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.
मोबाईलचा ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा काही घटनांमध्ये वाढ झालेली देखील पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मथुरामध्ये व्हिडीओ गेम खेळताना मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक 13 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय मुलगा Redmi च्या फोनवर व्हि़डीओ गेम खेळत होता. अचानक फोनचा स्फोट झाला आणि मोठा आवाज आला. यामध्ये मुलाचा चेहरा आणि हात गंभीररित्या भाजला आहे. मोबाईलचा ब्लास्ट झाल्याची ही काही पहिली घटना नाही. पण अनेकदा यामध्ये युजरची चूक असते तर कधी कंपनीची चूक असते. फोनचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
'अशी' घ्या काळजी
फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा वापर करणं महागात पडू शकतं. फोन चार्ज हेत असताना तो तापतो आणि याच दरम्यान त्याचा वापर केल्या तो ओव्हरहिट होऊन फुटू शकतो. फोन चार्ज करताना ओरिजनल चार्जरचा वापर करा. घाईघाईत अनेकदा दुसऱ्या चार्जरने चार्ज करतात. पण असं करणं जीवावर बेतू शकतं. जास्त लोड असल्यास फोन तापतो. त्यामुळे मेमरी थोडी रिकामी ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"