Redmi 10 2022: शाओमीच्या आगामी स्वस्त स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आले समोर; 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच

By सिद्धेश जाधव | Published: November 24, 2021 05:56 PM2021-11-24T17:56:21+5:302021-11-24T17:56:53+5:30

Redmi 10 2022: शाओमीचा Redmi 10 2022 स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट करण्यात आला आहे. आता या फोनच्या कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली आहे.

Redmi upcoming budget smartphone redmi 10 2022 camera specifications leaked  | Redmi 10 2022: शाओमीच्या आगामी स्वस्त स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आले समोर; 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच

Redmi 10 2022: शाओमीच्या आगामी स्वस्त स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आले समोर; 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच

googlenewsNext

Redmi 10 2022 नावाचा स्मार्टफोन लवकरच बाजारात येऊ शकतो. Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत येणारा हा फोन अनेक सर्टिफिकेशन्स वेबसाईटवर स्पॉट केला गेला आहे. हा या फोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन देखील समोर आले आहेत. त्यामुळे लवकरच Redmi 10 2022 स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला येईल हे स्पष्ट झालं आहे.  

Redmi 10 2022  

लिक्सनुसार Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये Samsung S5KJN1 किंवा OmniVision OV50C40 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात येईल. हा एक 50MP चा सेन्सर आहे. त्याचबरोबर Sony IMX355 सेन्सर सेकंडरी कॅमेऱ्याचे काम करेल, जो 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तर तिसरा कॅमेरा सेन्सर OmniVision OV02B1B किंवा GalaxyCore GC02M1B असेल, ज्याचे रिजोल्यूशन 2MP आहे. असाच कॅमेरा सेटअप याआधी Redmi 10 आणि Redmi 10 Prime मध्ये देखील मिळाला आहे.  

काही दिवसांपूर्वी रेडमीचा हा आगामी फोन इंडोनेशियन टेलीकॉम सर्टिफिकेशन्स वेबसाईट, TKDN, EEC, IMDA आणि TUV Rheinland या सर्टिफिकेशन्स वेबसाईटवर दिसला होता. तिथे या फोनच्या Xiaomi 2112119SG या मॉडेल नंबरची माहिती मिळाली होती. याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.  

Redmi 10 चे फिचर आणि स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Redmi 10 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो.   

Xiaomi Redmi 10 मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या रेडमी नव्या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: Redmi upcoming budget smartphone redmi 10 2022 camera specifications leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.