विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रेडमीचे स्वस्त लॅपटॉप लाँच; जाणून घ्या RedmiBook 15 सीरीजची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: August 3, 2021 04:44 PM2021-08-03T16:44:54+5:302021-08-03T16:45:59+5:30
RedmiBook 15 SeriesIndia Launch: रेडमीने भारतात RedmiBook 15 सीरिजमध्ये 2 लॅपटॉप लाँच केले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांचा विचार करून ही सीरिज लाँच केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
शाओमीच्या सब ब्रँड Redmi India ने भारतात आपली पहली लॅपटॉप सीरीज लाँच केली आहे. RedmiBook नावाच्या या सीरिजमध्ये कंपनीने दोन मॉडेल सादर केले आहेत. हे लॅपटॉप मॉडेल्स RedmiBook 15 Pro आणि RedmiBook 15 e-Learning Edition नावाने भारतीय बाजारात आले आहेत. रेडमीबुक सीरिज घरून काम करणाऱ्या लोकांसाठी तसेच ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सादर केल्याचे कंपनीने सांगितले आहे.
RedmiBook 15 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
RedmiBook 15 Pro मध्ये नावाप्रमाणे 15.6 इंचाचा डिस्प्ले आहे, जो फुल एचडी रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. RedmiBook 15 Pro लॅपटॉपमध्ये 11th-gen Intel TigerLake Core i5-11300H चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात Iris Xe ग्राफिक्स, 8GB DDR4 रॅम आहे आणि 512GB NVMe SSD स्टोरेज मिळते. हा लॅपटॉप 10 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. RedmiBook 15 Pro मध्ये मोफत विंडोज 10 होम आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम अँड स्टुडंट एडिशन 2019 देण्यात आले आहे.
RedmiBook 15 e-Learning Edition मध्ये देखील 15.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रो व्हर्जन प्रमाणे यात देखील मोफत विंडोज 10 होम आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टूडेंट एडिशन 2019 प्री-इंस्टॉल मिळतील. RedmiBook 15 e-Learning Edition लॅपटॉप 11th-gen Intel TigerLake Core i3-1115G4 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. यात 8GB रॅम आणि 256GB SATA SSD किंवा 512GB NVMe SSD स्टोरेज असे दोन ऑप्शन देण्यात आले आहेत. हा लॅपटॉप 10 तासांचा बॅटरी बॅकअप देतो, असा दावा करण्यात आला आहे. हे दोन्ही रेडमीबुक लॅपटॉप Windows 11 वर अपग्रेड करता येतील.
RedmiBook 15 सीरीज किंमत आणि सेल
RedmiBook 15 Pro ची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. RedmiBook 15 e-Learning Edition च्या 256GB व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे आणि 512GB व्हेरिएंट 44,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 6 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून हे दोन्ही रेडमीबुक mi.com, Flipkart आणि Mi Home वरून विकत घेता येतील.