भारतातील पहिला रेडमी लॅपटॉप 3 ऑगस्टला होणार लाँच; RedmiBook 15 नावाने घेणार एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: July 30, 2021 01:38 PM2021-07-30T13:38:22+5:302021-07-30T13:40:30+5:30
RedmiBook 15 specifications: रेडमीबुक 15 मध्ये नावाप्रमाणे 15.6 इंचाचा डिस्प्ले मिळेल, हा डिस्प्ले फुलएचडी रिजोल्यूशन असलेला एलसीडी पॅनल असेल.
काही दिवसांपूर्वी Xiaomi संबंधित एक मोठी बातमी आली कि कंपनी भारतात आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत पहिला लॅपटॉप डिवायस लाँच करणार आहे. याबाबत कंपनीने आपल्या ट्विटर अकॉउंटवरून माहिती दिली होती कि, हा लॅपटॉप येत्या 3 ऑगस्टला भारतात RedmiBook नावाने सादर केला जाईल. आता रेडमीबुकच्या लाँचच्या आधीच 91मोबाईल्सने सांगितले आहे कि हा रेडमी लॅपटॉप RedmiBook 15 नावाने भारतात सादर केला जाईल आणि याची किंमत 50,000 रुपयांच्या आसपास असेल.
91मोबाईल्सने टिपस्टर योगेशच्या हवाल्याने सांगितले आहे कि 3 ऑगस्टला RedmiBook 15 लॅपटॉप भारतात लाँच केला जाईल. या रेडमी लॅपटॉपची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल. या मीडिया रिपोर्टमध्ये लॅपटॉपच्या रंगाची देखील माहिती देण्यात आली आहे. टिपस्टरनुसार हा रेडमीबुक Charcoal Grey रंगांसह भारतीय बाजारात दाखल होईल.
RedmiBook 15 चे स्पेसिफिकेशन्स
रेडमीबुक 15 मध्ये नावाप्रमाणे 15.6 इंचाचा डिस्प्ले मिळेल, हा डिस्प्ले फुलएचडी रिजोल्यूशन असलेला एलसीडी पॅनल असेल. हा लॅपटॉप Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम आणि Intel 11th Gen Core i5 प्रोसेसरसह सादर केला जाईल. हा रेडमी लॅपटॉप 8GB रॅमसह 256GB आणि 512GB अश्या दोन स्टोरेज मॉडेलसह विकत घेता येईल.
RedmiBook 15 मध्ये ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, USB Type-C 3.1, USB Type-A, USB 2.0 आणि HDMI पोर्ट असे कनेक्टिव्हिटी पर्याय दिले जाऊ शकतात. एचडी वेबकॅम, दोन 2वॉट स्पिकर्स आणि 3.5mm ऑडिओ जॅक देखील या लॅपटॉपमध्ये मिळेल. RedmiBook 15 मधील बॅटरीच्या क्षमतेची माहिती मिळाली नाही परंतु हा लॅपटॉप 65वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल.