शाओमीचे स्वस्त लॅपटॉप लवकरच येणार भारतात; 3 ऑगस्टला पहिला RedmiBook होऊ शकतो लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:24 PM2021-07-27T16:24:59+5:302021-07-27T16:25:33+5:30
RedmiBook Launch In India: Redmi लॅपटॉप भारतात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे, याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे.
शाओमीच्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत पहिला लॅपटॉप भारतात लाँच केला जाणार आहे. Redmi लॅपटॉप भारतात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे, याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे. हा लॅपटॉप RedmiBook नावाने भारतात लाँच केला जाईल.
शाओमीच्या सब-ब्रँड रेडमी इंडियाने आपल्या आगामी डिवाइसची माहिती ट्विटरवरून दिली आहे. कंपनी येत्या 3 ऑगस्टला भारतात लॅपटॉप लाँच करणार आहे. हा लॅपटॉप रेडमीबुक नावाने लाँच केला जाईल. हा रेडमी ब्रँड अंतर्गत भारतात लाँच होणारा पहिला लॅपटॉप असेल. यासाठी कंपनीने एक मायक्रो साईट लाईव्ह केली आहे. या साईटवर ‘नोटिफाय मी’ बटन देण्यात आले आहे. या याआधी शाओमीच्या मी ब्रँडचे काही लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आले आहेत.
So, folks in the laptop team have been up to some shenanigans🤓
— Redmi India - #RedmiBook Super Start Life (@RedmiIndia) July 27, 2021
They have been working on a top-secret project and a couple of scenes have leaked!🧐
We think you'll love to see what these guys have been up to!😁
👉Know more: https://t.co/0LL34G2Znr#RedmiBook#SuperStartLifepic.twitter.com/15aC05CHEv
यापूर्वी कंपनीने भारतात Mi Notebook 14, Mi Notebook 14 Horizon Edition, Mi Notebook 14 IC आणि Mi Notebook 14 e-Learning Edition लॅपटॉप लाँच केले आहेत. कंपनी मी आणि रेडमी ब्रँड अंतगर्त चीनमध्ये अनेक लॅपटॉप सादर केले आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये Mi Notebook Pro X 15 लॅपटॉप 11th-generation Intel CPUs आणि लेटेस्ट Nvidia GeForce RTX 30 सीरीज जीपीयूसह सादर केला होता. तर फेब्रुवारीमध्ये RedmiBook Pro 14 आणि RedmiBook Pro 15 मॉडेल्स लाँच करण्यात आले होते.