रेडमीचे फोन पुन्हा महागले; दीड महिन्यांतील मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:55 PM2020-05-13T18:55:45+5:302020-05-13T18:57:43+5:30

शाओमीच्या फोनना भारतात मोठा ग्राहक आहे. कमी किंमतीत नवनवीन फिचर देण्यात येतात.

Redmi's phones Redmi 8A Dual, Redmi 8 more expensive again hrb | रेडमीचे फोन पुन्हा महागले; दीड महिन्यांतील मोठी वाढ

रेडमीचे फोन पुन्हा महागले; दीड महिन्यांतील मोठी वाढ

Next

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतातील तिच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. साधारणत: स्मार्टफोनच्या किंमती दिवसेंदिवस कमी कमी होत जातात. कारण कंपन्यांना नवीन मॉडेल बाजारात आणायची असतात. मात्र, शाओमीने दीड महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा किंमत वाढविली आहे. 


शाओमीच्या फोनना भारतात मोठा ग्राहक आहे. कमी किंमतीत नवनवीन फिचर देण्यात येतात. आज किंमतीत वाढ झालेल्या फोनमध्ये शाओमीचा ब्रँड रेडमीचे Redmi 8A Dual, Redmi 8 आणि Redmi Note 8 हे तीन फोन आहेत. याफोनच्या किंमतीमध्ये ५०० रुपयांची वाढ केली आहे. या आधी १ एप्रिलला जीएसटी दर वाढल्याने कंपनीने सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढविल्या होत्या. कंपनीने या नव्या किंमतवाढीचे अपडेट वेबसाईटवर दिले आहेत. 


कंपनीने रेडमी नोट ८ ची किंमत ५०० रुपये तर रेडमी ८ए ची किंमत ३०० रुपयांनी वाढविली आहे. यामुळे या किंमतवाढीमुळे रेडमी नोट 8 4GB + 64GB मॉडेलची किंमत 11,499 रुपये झाली आहे. 


रेडमी 8A Dual चे 2GB + 32GB मॉडेल 7,299 ला मिळणार आहे. याची किंमत आधी 6,999 रुपये होती. तर याचा ३ जीबी रॅमचे मॉडेल 7,999 ना मिळणार आहे. रेडमी 8 फोनचे 4GB + 64GB जीबी मॉडेलची किंमत 9,299 रुपये झाली आहे. याची आधी किंमत 8,999 रुपये होती. 
एक एप्रिलला स्मार्टफोनची किंमत वाढली होती. जीएसटी रेट १२ वरून १८ टक्के केल्याने फोनच्या किंमती वाढल्या होत्या. यानुसार या तिन्ही फोनच्या किंमती ५०० ते १००० रुपयांनी वाढल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या...

उद्या नाही, १५ मेपासून घरपोच दारू मिळणार; फक्त एकच मोठी अट

सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ

Atmanirbhar Bharat Abhiyan मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Web Title: Redmi's phones Redmi 8A Dual, Redmi 8 more expensive again hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.