Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:40 PM2024-10-26T14:40:54+5:302024-10-26T14:41:35+5:30

हा जो काही प्रकार आहे तो रोमान्स करताना वापरावा लागणार आहे. यामुळे तुमच्यासोबत पार्टनर देखील सुरक्षित राहणार आहे.

Relationship: German condome maker company billy Boy launch Digital Condom, Camdom aap; How to use those moments, sex, intercourse, romance? Partner will also be safe | Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित

Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित

जर्मन कंडोम कंपनी बिली बॉयने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. या कंपनीने इनोसन बर्लिनसोबत मिळून डिजिटल कंडोम बनविला आहे. हा जो काही प्रकार आहे तो रोमान्स करताना वापरावा लागणार आहे. यामुळे तुमच्यासोबत पार्टनर देखील सुरक्षित राहणार आहे. चला जाणून घेऊया हा नेमका काय प्रकार आहे. 

सध्या इंटरनेटवर अनेक प्रसिद्ध व्यक्ती, इन्फ्लुएन्सर किंवा प्रियकर प्रेयसीचे शरीरसंबंधावेळचे व्हिडीओ व्हायरल होते असतात. हे व्हिडीओ पार्टनर किंवा अन्य कोणीतरी रेकॉर्ड करत असतात. कळत नकळत रेकॉर्ड केलेले हे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांच्या आयुष्यात ते बॉम्ब बनून पडतात. अनेकांचे संसार तुटतात, अनेकांची नाती तुटतात, आयुष्य उध्वस्त करणारा हा प्रकार असतो. याला मोठमोठ्या हिरोईन, इन्फ्लिुएन्सर, नेते आदी बळी पडलेले आहेत. अनेकदा आपण प्रायव्हेट व्हिडीओ लीकच्या बातम्याही वाचत असतो. यापासून सुटका करण्यासाठी कंडोम बनविणाऱ्या कंपनीने पुढाकार घेतला आहे. 

Billy Boy या जर्मन कंपनीने Camdom नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. याचा प्रचार ही कंपनी “digital condom” असा करत आहे. कपल जेव्हा शरीरसंबंध ठेवत असले तेव्हा हे अ‍ॅप दोघांचेही मोबाईलचे कॅमेरे आणि माईक ब्ल़ॉक करते. यामुळे त्यावेळच्या गोष्टी, आवाज आदी तुमचा स्मार्टफोन किंवा त्यामधील अ‍ॅप टिपू शकत नाहीत. आहे की नाही तुमची आणि तुमच्या पार्टनरची सुरक्षा.

आता कसे वापरायचे...
हे कॅमडोम अ‍ॅप गुगल प्लेस्टोअर, अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनललोड करावे लागणार आहे. यानंतर आपल्या पार्टनरच्या मोबाईलवरही हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. हे अ‍ॅप ब्लूटूथवर काम करते. यामुळे दोन्ही फोन अ‍ॅपद्वारे ब्लुटूथने कनेक्ट होतात व कॅमेरा रेकॉर्डिंग, मायक्रोफोन आदी ब्लॉक करतात. नेहमी सेक्स करताना, रोमान्स करताना हे अ‍ॅप सुरु करायचे आहे. संपल्यानंतर तीन सेकंद अ‍ॅपवरील बटन दाबून ठेवल्यानंतर ते डिअ‍ॅक्टीव्हेट होणार आहे. 

हेतू चांगला पण...
यामागचा हेतू चांगला आहे. परंतू, हे अॅप केवळ स्मार्टफोनमधील अॅप जी अशा गोष्टी रेकॉर्ड करतात त्यांनाच प्रतिबंध करू शकते. परंतू, एखाद्याला वाईट हेतून आपल्या पार्टनरचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असेल किंवा जसे की आता जे व्हिडीओ लीक होतात तसे परस्पर संमतीने रेकॉर्ड करायचे असतील तर ते मात्र रोखता येणार नाहीय. यामुळे हे अॅप वापरणे पार्टनरसोबतच्या परस्पर संमतीवर अवलंबून असणार आहे. 

Web Title: Relationship: German condome maker company billy Boy launch Digital Condom, Camdom aap; How to use those moments, sex, intercourse, romance? Partner will also be safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.