Reliance Jio 5G Network: 15 नाही, 1000 शहरांमध्ये मिळणार 5G नेटवर्क; कोणती कोणती शहरे Jio च्या यादीत पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 08:44 AM2022-01-23T08:44:49+5:302022-01-23T08:45:14+5:30
Reliance Jio 5G Network: या शहरांची निवड करण्यासाठी जिओने एक प्लॅन बनविला आहे. रिलायन्स जिओ गेल्या वर्षीपासून 5G नेटवर्कची टेस्टिंग करत आहे. रिलायन्सच्या ताब्यात देशातील बहुतांश मोबाईल टॉवर आहेत. याचाच फायदा जिओला होणार आहे.
देशात 5G नेटवर्कची सुरुवात मोठ्या १५ शहरांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता सारखी शहरे आहेत, असे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. परंतू, रिलायन्स जिओने देशाभरात 5Gचा धमाका करण्याचा प्लॅन आखला आहे. जिओ जवळपास १००० शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फाईव्ह जी सेवा देणार आहे.
रिलायन्स जिओ गेल्या वर्षीपासून 5G नेटवर्कची टेस्टिंग करत आहे. कंपनीचा दावा आहे, की हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. जिओकडून हेल्थकेअर, इंडस्ट्रिअल ऑटोमेशनची टेस्टिंग केली जात आहे. रिलायन्सच्या ताब्यात देशातील बहुतांश मोबाईल टॉवर आहेत. याचाच फायदा जिओला होणार आहे. 5G नेटवर्कसाठी जे काही लागते ते सारे वेगाने उभारण्याचे काम जिओ करत आहे. मोबाईल टॉवरला वीजेचीउपलब्धता देखील वाढविली जात आहे.
या शहरांची निवड करण्यासाठी जिओने एक प्लॅन बनविला आहे. ज्या भागाता जास्त डेटा वापरला जातो, त्या भागात सुरुवातीला 5G नेटवर्क पुरविले जाणार आहे. अशा भागाची ओळख पटविण्यासाठी, तसेच ग्राहकांना ओळखण्यासाठी जिओने हिट मॅप्स, 3 डी मॅप्स आणि रे ट्रेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहक आधारित नेटवर्क बनविण्यासाठी जिओने अनेक टीम तयार केल्या आहेत.
रिलायन्स जिओचा ARPU (म्हणजे प्रति ग्राहक प्रति महिना सरासरी महसूल) देखील वाढला आहे. दरमहा प्रति ग्राहक एआरपीयू 151.6 रुपये झाला आहे. जिओ नेटवर्कवरील प्रत्येक ग्राहकाने दरमहा १८.४ जीबी डेटा वापरला आणि सुमारे ९०१ मिनिटे बोलले.
Jio ने या तिमाहीत सुमारे 12 दशलक्ष ग्राहक आपल्या नेटवर्कमध्ये जोडले. मात्र या तिमाहीत जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या ८४ लाखांनी कमी झाली आहे. जिओची ग्राहक संख्या आता ४२ कोटी १० लाखांच्या जवळपास आहे. तर Jio Fiber ने 50 लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे.