Reliance Jio 5G Network: जिओचे 5G नेटवर्क या चार शहरांत सुरु होणार; पहा तुमचे शहर आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 05:19 PM2022-10-04T17:19:14+5:302022-10-04T17:19:35+5:30
रिलायन्स जिओची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कंपनीकडे एक ग्राहक नव्हता. परंतू, बघता बघता रिलायन्सची सिमकार्ड घेण्यासाठी लोकांचा रांगा लागू लागल्या होत्या
एअरटेलने भारतात ५जी सेवा सुरु करून आघाडी घेतली आहे. परंतू, ४जी सेवा सुरु करून धुमाकूळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओचे ग्राहक अद्याप तरी ५जी कधी सुरु होणार याचीच वाट पाहत आहेत. असे असताना रिलायन्स जिओच्या ५जी बाबत मोठी अपडेट आली आहे.
Airtel 5G Signal: हुर्रे! 5G नेटवर्क मिळू लागले; स्मार्टफोनवर साईनही दिसू लागले; तुम्हीही करा चेक...
रिलायन्स जिओची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कंपनीकडे एक ग्राहक नव्हता. परंतू, बघता बघता रिलायन्सची सिमकार्ड घेण्यासाठी लोकांचा रांगा लागू लागल्या होत्या एअरटेल, व्होडाफोन, आयडियाचे ग्राहक तिकडे वळू लागले होते. आज रिलायन्समध्ये सर्वात मोठा ग्राहकवर्ग आहे. अन्य कंपन्यांची सिम ही आता दुय्यम झाली आहेत. असे असताना तोच गेम एअरटेलने खेळला आहे. ५जी त्यांनी आठ शहरांत सुरु करून आघाडी घेतली आहे. याचा फटका जिओला बसण्याची शक्यता असताना जिओने देखील कंबर कसली आहे.
येत्या दिवाळीपर्यंत जिओ चार मोठ्या शहरांत आपली 5G सेवा सुरु करणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईचा समावेश आहे. यानंतर जिओ पुण्यासाऱ्या शहरांत आपली सेवा विस्तारणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व तालुका, जिल्हा पातळीवर जिओची ५जी सेवा पसरलेली असणार आहे.
5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...
किती असेल खर्च...
रिलायन्सने परवडणाऱ्या किंमतीत ५जी सेवा सुरु केली जाईल असे म्हटले आहे, असे असले तरी प्लान्सबाबत काहीही कल्पना दिलेली नाही. सध्या जे ४जीचे प्लान आहेत, त्यात काही रुपये वाढवून हे प्लॅन तयार केले जाणार आहेत. यामध्ये डेटाचा वापरही वाढणार असल्याने त्याप्रमाणे पैसे आकारले जाण्याची शक्यता आहे.