Reliance Jio 666 Plan Offer: जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनवर 250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक; कुठेही नाही अशी ऑफर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:23 AM2022-11-08T08:23:33+5:302022-11-08T08:24:00+5:30
Reliance Jio 666 Plan, 250 rs Cashback Offer:सुरुवातीला जिओने कॅशबॅकच्या भन्नाट स्कीम आणल्या होत्या. परंतू आता त्या बंद केल्या आहेत. तरीदेखील तुम्ही जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये जवळपास २५० रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकणार आहात. कसे ते पहा...
गेल्या वर्षीपासून रिलायन्स जिओची रिचार्ज खूप महाग झाली आहेत. ज्या कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात स्वस्ताई आणली होती, त्या कंपनीने जवळपास ६० ते ७० टक्क्यांनी रिचार्जचे रेट वाढविले आहेत. यामुळे दर महिन्याला रिचार्ज करणे ग्राहकांना परवडणारे राहिलेले नाही. पूर्ण वर्षाचा प्लॅन घेणे देखील एकदम परवडणारे नाही. यामुळे जिओचे ग्राहक महिना किंवा तीन महिन्याची म्हणजेच २२-२८ दिवस किंवा ८४ दिवसांची रिचार्ज करत आहेत.
सुरुवातीला जिओने कॅशबॅकच्या भन्नाट स्कीम आणल्या होत्या. परंतू आता त्या बंद केल्या आहेत. तरीदेखील तुम्ही जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये जवळपास २५० रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकणार आहात. कसे ते पहा...
६६६ रुपयांचा प्लॅन हा ८४ दिवसांचा आहे. जो पूर्वी ४५० रुपयांच्या आसपास मिळत होता, त्यासाठी आता साडे सहाशे रुपये मोजावे लागत आहेत. जर तुम्हाला रिचार्ज करत असताना मोठा कॅशबॅक हवा असेल तर तुम्हाला रिलायन्सच्या MyJio अॅपवर जावे लागणार आहे. येथून तुम्हाला ६६६ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागणार आहे. तो सिलेक्ट केल्यावर तुम्हाला पेमेंटच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
तिथे तुम्हाला काही ऑफर दिसतील. यामध्ये तुम्हाला CREDPay UPI द्वारे पेमेंट करावे लागेल. यासाठी तुम्हाला आधी क्रेड पेचे अॅप डाऊनलोड करून त्यात युपीआय रजिस्टर करावा लागणार आहे. क्रेड पे हे क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याचे एक प्रसिद्ध अॅप आहे. जिओचे रिचार्ज करताना तुम्हाला कमीतकमी ट्रान्झेक्शन १४९ रुपये असावे अशी अट आहे.
तुम्हाला २५० रुपयांचा पूर्ण कॅशबॅक मिळेल असे नाही, परंतू २५० रुपयांपर्यंत मिळेल एवढे नक्की. आजच्या घडीला कुठेही अशी डील नसल्याने ही डील पैसे वाचविणारी ठरेल. ६६६ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता आणि दर दिवशी १.५ जीबी डेटा दिला जातोय. कॉलिंग अनलिमिटेड असून १०० एसएमएस दिले जातील. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चा अॅक्सेसही दिला जाईल.