Reliance Jioचे दोन नवीन प्लॅन लाँच; जाणून घ्या फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:24 PM2019-01-24T17:24:00+5:302019-01-24T17:29:14+5:30
रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी नवीन दोन प्लॅन बाजारात आणले आहेत. रिलायन्स जिओने 297 आणि 594 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 500 एमबी 4 जी डेटा मिळणार आहे.
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी नवीन दोन प्लॅन बाजारात आणले आहेत. रिलायन्स जिओने 297 आणि 594 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 500 एमबी 4 जी डेटा मिळणार आहे. यासोबतच नॅशनल आणि लोकल कॉलिंग अनलिमिटेड दिली आहे.
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्संना एकूण 300 एसएमएस पाठविण्याची सुविधा मोफत देण्यात आली आहे. याशिवाय जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा मोफत आहे. 297 रुपयांच्या पॅकमध्ये 84 दिवसांची मर्यादा आहे. तसेच, यामध्ये एकूण 42 जीबी डेटा मिळणार आहे. दररोज 0.5 जीबी डेटा मिळणार आहे. जर, युजर्संनी संपूर्ण डेटा वापरला असेल, तर त्यानंतर 64 kbps स्पीडसोबत अनलिमिटेड डेटा मिळत राहील.
दुसऱ्या 594 रुपयांचा पॅक आहे. यामध्ये युजर्संना एकूण 84 जीबी डेटा मिळणार आहे. याची 168 दिवसांची मर्यादा असणार आहे. तसेच, या पॅकमध्ये युजर्संना दररोज 0.5 जीबी डेटा वापरता येणार आहे. डेटा संपल्यानंतर 64kbps च्या स्पीडने इंटरनेटचा वापर होऊ शकणार आहे. याचबरोबर, 300 एसएमएस, नॅशनल आणि लोकल कॉलिंग अनलिमिटेड आहे.
दरम्यान, टेलिकॉम क्षेत्रात लॉन्ग टर्म व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनचा ट्रेंड पुन्हा सुरु झाला आहे. बीएसएनएल, एअरटेल आणि व्होडाफोन कंपन्यांनी सुद्धी नवीन प्लॅन बाजारात आणले आहेत. रिलायन्स जिओचा नवीन प्लॅन जिओ फोनच्या नवीन युजर्ससाठी सुद्धा आहे.