क्रिकेट वर्ल्ड कप आता फुल सुसाट... Jio देणार Airtel पेक्षा दुप्पट स्पीड, तयारी झाली पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:39 PM2023-09-30T12:39:39+5:302023-09-30T12:39:54+5:30
रिलायन्स जिओने २०२३ च्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी वेगवान इंटरनेट स्पीडचे आश्वासन दिले आहे.
Jio Airtel, ODI World Cup 2023: क्रिकेट विश्वचषक २०२३ भारतात सुरू होत आहे. यासाठी रिलायन्स जिओने तयारी केली असून युजर्सना क्रिकेट मॅच पाहण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ते सज्ज होत आहेत. विशेष म्हणजे तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेट वर्ल्ड कप पाहिलात तर तुम्हाला जिओकडून वेगवान इंटरनेट स्पीड मिळेल असा एक वेगळा प्लॅन असणार आहे. ओपन सिग्नलच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट स्टेडियमच्या आत आणि बाहेर इंटरनेट डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने बाजी मारली आहे. रिलायन्स जिओचा सरासरी डाउनलोड स्पीड ६१.७ Mbps आहे, तर Airtel ३०.५ Mbps सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत वोडाफोन आयडिया १७.७ Mbps सह तिसऱ्या स्थानी आहे.
डाउनलोडिंग / अपलोडिंग स्पीडमध्ये पुढे कोण, मागे कोण?
रिलायन्स जिओ डाउनलोडिंग स्पीडमध्ये पुढे आहे. तसेच 5G डाउनलोड स्पीडच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. Jio चा 5G डाउनलोड स्पीड Airtel पेक्षा 25.5 टक्के जास्त आहे. Jio चा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 344.5 Mbps नोंदवला गेला. तर एअरटेलचा स्पीड 274.5 Mbps आहे.
जर आपण अपलोडिंग स्पीडबद्दल बोललो, तर एअरटेल या बाबतीत पुढे आहे. क्रिकेट स्टेडियममध्ये एअरटेलचा सरासरी अपलोड स्पीड ६.६ Mbps होता, तर जिओचा सरासरी अपलोड स्पीड ६.३ Mbps होता. Vodafone Idea 5.8 Mbps सह तिसऱ्या स्थानावर राहिली. यासह, सरासरी 5G अपलोडिंग गतीच्या बाबतीत एअरटेल अव्वल स्थानावर आहे. तर एअरटेलचा स्पीड 26.3 Mbps होता. रिलायन्स जिओचा स्पीड २१.६ Mbps आहे.
कोणाकडे किती 5G वापरकर्ते आहेत?
सध्या, एकूण 5G नेटवर्क वापरकर्त्यांमध्ये जिओचे सर्वाधिक ५३ टक्के वापरकर्ते आहेत. तर एअरटेल २०.७ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.