बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 01:40 PM2020-05-03T13:40:07+5:302020-05-03T13:45:15+5:30

रिलायन्स जिओने मार्च 2020 मध्ये एक टूल लाँच केलं होतं. ज्या टूलच्या मदतीने कोरोना व्हायरसची लक्षण समजण्यास मदत होत होती.

reliance jio covid 19 checker tool database exposed online SSS | बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

Next

नवी दिल्ली - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या लॉकडाऊनमध्ये लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट होत आहेत. रिलायन्स जिओने मार्च 2020 मध्ये एक टूल लाँच केलं होतं. ज्या टूलच्या मदतीने कोरोना व्हायरसची लक्षण समजण्यास मदत होत होती. तसेच कोरोनाबाबतची संपूर्ण माहिती ही यामध्ये देण्यात आली होती. लक्षणे, सल्ला, कोरोनाग्रस्तांचा आकडा अशी विविध माहिती आहे. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

लाखो जिओ युजर्सचा डेटा हा ऑनलाईन लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. जिओ युजर्सचा कोविड19 रिझल्ट असणारा डेटाबेस ऑनलाईन लीक झाल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली. धक्कादायक म्हणजे हा डेटाबेस पासवर्ड शिवाय देखील अ‍ॅक्सेस करता येतो.  TechCrunch ने दिलेल्या रिपोर्टनुसार, टूलच्या मुख्य डेटाबेसमध्ये सुरक्षिततेची कमतरता असल्याने युजर्सचे टेस्ट रिझल्ट हे इंटरनेटवर पासवर्ड शिवाय एक्सपोज झाले आहेत. रिलायन्स जिओला याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने डेटाबेस ऑफलाईन केला आणि बगबाबत माहिती दिली आहे.

लीक झालेल्या डेटाबेसमध्ये 17 एप्रिलपासून डेटाबेस ऑफलाईन होईपर्यंत लाखो रेकॉर्डस् लीक झाले आहेत. यामध्ये ज्या लोकांनी आपली टेस्ट केली आहे त्यांची माहिती होती. टूलने युजर्सला विचारलेल्या सर्व प्रश्नांची यामध्ये उत्तर देण्यात आली होती. तो रेकॉर्ड देखील यामध्ये होता. काही युसर्जच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्या लोकेशनची माहिती देण्यात आली होती. खासकरून यामध्ये मुंबई आणि पुण्यातील युजर्स आहेत. यावर तातडीने अ‍ॅक्शन घेतल्याची माहिती रिलायन्स जिओने टेक क्रंचला दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना सलाम; रुग्णालयांवर हवाई दलाकडून पुष्पवर्षाव

गड्या आपला गावच बरा... लॉकडाऊनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

 

Web Title: reliance jio covid 19 checker tool database exposed online SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.