Reliance Jio चा फ्रीडम प्लॅन, ३० दिवसांसाठी मोफत कॉलिंग आणि डेटा सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:42 PM2024-08-07T14:42:14+5:302024-08-07T14:42:59+5:30

Reliance Jio Freedom Plan: कंपनीने अनेक प्लॅन्स हटविले आहेत आणि बहुतेक प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. आताही जिओ आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक शानदार ऑफर देत आहे.

Reliance Jio Freedom Plan: Here are all the prepaid data packs that come with no daily limit | Reliance Jio चा फ्रीडम प्लॅन, ३० दिवसांसाठी मोफत कॉलिंग आणि डेटा सुविधा

Reliance Jio चा फ्रीडम प्लॅन, ३० दिवसांसाठी मोफत कॉलिंग आणि डेटा सुविधा

Reliance Jio Freedom Plan: रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे सध्या ४८ कोटींहून अधिक युजर्स आहेत. जिओने नुकताच आपला पोर्टफोलिओ बदलला आहे. कंपनीने अनेक प्लॅन्स हटविले आहेत आणि बहुतेक प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. आताही जिओ आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक शानदार ऑफर देत आहे.

जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जिओ सिम वापरत असाल आणि महागड्या प्लॅन्सपासून दूर राहण्यासाठी परवडणारा प्लॅन शोधत असाल तर कंपनीने एक शानदार प्लॅन आणला आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक दमदार प्लॅन अॅड केला आहे. जिओच्या या फ्रीडम प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग, डेटा अशा अनेक सेवा मिळतील.

दरम्यान, जिओचा फ्रीडम प्लॅन ३५५ रुपयांच्या किंमतीत येतो. जिओच्या इतर प्लॅनच्या तुलनेत या रिचार्ज प्लॅनचे फायदे थोडे वेगळे आहेत. या फ्रीडम प्लॅनमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना पूर्ण ३० दिवसांची वैधता प्रदान करते. तसंच, तुम्ही ३० दिवसांसाठी अमर्यादित मोफत कॉलिंगची सुविधा घेऊ शकता.

जाणून घ्या, डेटा बेनिफिट्सबद्दल...
जिओ फ्रीडम प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये एकूण २५ जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. या प्लॅनची ​​सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हा डेटा वापरू शकता. तुम्ही पूर्ण ३० दिवसांसाठी २५ जीबी डेटा वापरू शकता किंवा ते सर्व एका दिवसात वापरू शकता. या प्लॅनसह जिओ आपल्या लाखो युजर्सना एसएमएस सुविधा देखील देण्यात आली आहे. तसेच, ग्राहकांना दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात.

Web Title: Reliance Jio Freedom Plan: Here are all the prepaid data packs that come with no daily limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.