Reliance Jio ब्रॉडबँड आणि टीव्ही 15 ऑगस्टपासून; 500 रुपयांपासून प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 01:35 PM2018-08-13T13:35:25+5:302018-08-13T13:36:20+5:30
JIO PLAN: मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओआता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे .
नवी दिल्ली : मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओआता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे . गिगाफायबरच्या रजिस्ट्रेशनसाठी 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅनची सुरुवात 500 रुपयांपासून असण्याची शक्यता आहे. यामध्ये अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेटसोबत बेस्ड टीव्हीची सुविधा असणार आहे.
एका रिपोर्टनुसार, दिवाळी सणाच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओ गीगाफायबर बाजारात आणणार आहे. यामध्ये 700 रुपयांपासून 1000 रुपयापर्यंत 100 Mbps चा स्पीड मिळण्याची शक्यता आहे. तसेच, 100GB पर्यंत डेटा मर्यादा असणार आहे. दरम्यान, टीव्ही सर्व्हिससाठी वेगळे 250-300 रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, रिलायन्स जिओ कंपनी या प्लॅनच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी ब्रॉडबॅंड आणि टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जिओ होम ब्रॉडबॅंडची किंमती सध्या 4 जी मोबाइल डेटा रेट पेक्षा 25-30 टक्के स्वस्त होतील.
जिओ गिगाफायबर (JioGigaFiber) टू द होम म्हणजे FTTH वर आधारित आहे. FTTH म्हणजे आपल्याला इंटरनेट सर्व्हिस पाहिजे, तर आपल्या घरापर्यंत एक केबल देण्यात येईल. सध्या ज्या केबलद्वारे आपल्याला इंटरनेट दिले जाते. त्याचा स्वीड जास्त नसतो. कंपनी दोन वर्षांपासून FTTH टेस्टिंग करत आहे.