Jio GigaFiber: असा मिळवा ३०० जीबी डेटा फ्री, अनुभवा सुस्साट इंटरनेट स्पीड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 05:50 PM2018-09-19T17:50:13+5:302018-09-19T17:51:30+5:30
Jio GigaFiber Plan: जिओनं गिगाफायबरची प्रिव्ह्यू ऑफर सादर केलीय. जिओ गिगाफायबर सेवा कशी आहे, त्याची जमेची बाजू काय आणि उणिवा काय, याचा ग्राहकांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, हा त्यामागचा हेतू आहे.
आधी मोफत मोबाइल इंटरनेट देऊन भारतीयांना 'याड' लावणारी रिलायन्स जिओ आता सुस्साट इंटरनेट घेऊन येणार आहे. रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा 'जिओ गिगाफायबर'चं (JioGigaFiber) रजिस्ट्रेशन १५ ऑगस्टपासून सुरू झालं आहे. त्यानंतर थोड्याच दिवसांनी जिओनं गिगाफायबरची प्रिव्ह्यू ऑफर सादर केलीय. जिओ गिगाफायबर सेवा कशी आहे, त्याची जमेची बाजू काय आणि उणिवा काय, याचा ग्राहकांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, हा त्यामागचा हेतू आहे. काय आहे ही नेमकी ऑफर आणि त्यासाठी नोंदणी कशी करायची, याबद्दल जाणून घेऊया.
>> जिओ गिगाफायबर प्रिव्ह्यू ऑफरमध्ये ग्राहकांना दर महिन्याला १०० जीबी यानुसार तीन महिन्यांसाठी ३०० जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे.
>> समजा, तुमचा १०० जीबी डेटा महिना संपायच्या आतच संपला, तर तुम्हाला ४० जीबी आणखी डेटा दिला जाईल आणि तोही मोफत असेल. माय जिओ अॅप किंवा जिओ डॉट कॉमवरून आपण हा ४० जीबीचा टॉप-अप मिळवू शकतो.
>> जिओ गिगाफायबरचा स्पीड १ जीबीपीएस असेल असा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच, हे नेटवर्क वापरून आपण 4के व्हिडीओ पाहू शकतो आणि व्हीआर गेमही खेळू शकूतो.
>>रिलायन्स जिओ गिगाफायबर प्रिव्ह्यू ऑफरमध्ये ONT डिव्हाइससाठी ४,५०० रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागेल. ही रक्कम रिफंड मिळू शकते. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, जिओ मनी किंवा पेटीएमद्वारे आपण ही रक्कम भरू शकतो.
>> येत्या महिन्यात जिओ गिगाफायबरसाठी कंपनी प्रीपेड प्लॅन जाहीर करू शकते. प्रिव्ह्यू ऑफर ९० दिवसांनंतर संपल्यावर आपण कोणताही प्रीपेड प्लॅन निवडू शकतो.
>> तीन महिन्यांनंतर आपल्याला गिगाफायबर कनेक्शन बंद करायचं असेल तर ती सोयही उपलब्ध आहे. त्यावेळी आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळू शकेल.
>> जिओ गिगाफायबर सेवेसाठी आपण रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर नोंदणी करू शकतो. त्यासाठी घर किंवा ऑफिसचा पत्ता आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.
>> दिवाळीच्या आधी जिओ गिगाफायबर सेवा देशातील मेट्रो शहरांसह ८० प्रमुख शहरांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
>> जिओ ब्रॉडबँड सेवेसाठी नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. ही नोंदणी केली म्हणजे आपल्याला प्रिव्ह्यू ऑफर मिळाली असे नाही. आपल्या शहरातील किती जणांनी गिगाफायबरसाठी नोंदणी केली आहे, यावर हा वेळ अवलंबून आहे.
>> आपल्या शहरातून बऱ्याच जणांनी जिओ गिगाफायबरसाठी नोंदणी केली असेल, तर तिथे आधी सेवा सुरू केली जाईल. त्यावेळी जिओ प्रिव्ह्यू ऑफरसाठी आपल्याशी संपर्क साधेल.
>> रिलायन्स जिओ प्रिव्ह्यू ऑफरसाठी आपल्याला कुठलेही जोडणी शुल्क भरावे लागणार नाही.