Reliance Jio GigaFiber : आजपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात; 500 रुपयांपासून प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 02:57 PM2018-08-15T14:57:16+5:302018-08-15T14:57:35+5:30
मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओ आता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे. गिगाफायबरच्या रजिस्ट्रेशनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली : मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओ आता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे. गिगाफायबरच्या रजिस्ट्रेशनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे.
जिओ गिगाफायबर गेल्या महिन्यात लाँच करण्यात आले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गिगाफायबर सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहकाला 1Gbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. सध्या गिगाफायबर सर्व्हिससाठी ग्राहकाला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तसेच, ज्या शहरातून सर्वाधिक जास्त रजिस्ट्रेशन होईल, त्या शहराला पहिल्यांदा गिगाफायबर कनेक्शन देण्यात येणार आहे. देशातल्या 1,100 शहरांपर्यंत जिओ गिगाफायबरचे जाळे पसरवण्याचा कंपनीने दावा केला आहे.
याचबरोबर, एका रिपोर्टनुसार, जिओ गिगाफायबर प्लॅनची सुरुवात 500 रुपयांपासून असण्याची शक्यता आहे. यामध्ये अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेटसोबत बेस्ड टीव्हीची सुविधा असणार आहे. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओ गिगाफायबर बाजारात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना 700 रुपयांपासून 1000 रुपयापर्यंत 100 Mbps चा इंटरनेट स्पीड मिळण्याची शक्यता आहे. तसेच, 100GB पर्यंत डेटा मर्यादा असणार आहे. दरम्यान, रिलायन्स जिओ कंपनी या प्लॅनच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी ब्रॉडबॅंड आणि टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जिओ होम ब्रॉडबॅंडची किंमती सध्या 4 जी मोबाइल डेटा रेट पेक्षा 25-30 टक्के स्वस्त होतील.
अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन...
जिओ गिगाफायबरचे रजिस्ट्रेशन jio.com या संकेतस्थळावर करता येणार आहे. यासाठी कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. रजिस्ट्रेशन करताना ग्राहकाला आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि ईमेल याची माहिती द्यावी लागणार आहे.