फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य  

By सिद्धेश जाधव | Published: August 31, 2021 04:55 PM2021-08-31T16:55:13+5:302021-08-31T17:00:04+5:30

Jio Phone Next Price: Reliance Jio आणि Google यांनी मिळून बनवलेल्या JioPhone Next स्मार्टफोनबाबत मोठा खुलासा झाला आहे. हा फोन Basic आणि Advance अश्या दोन मॉडेल्समध्ये सादर केला जाईल.  

reliance jio Jiophone next 4g smartphone will be availble at 10 percent down payment of sale price | फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य  

फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य  

googlenewsNext
ठळक मुद्देहा एंट्री लेव्हल स्मार्टफोन विकत घेण्यासाठी युजर्सना संपूर्ण किंमत द्यावी लागणार नाही. JioPhone Next स्मार्टफोन दोन मॉडेल्समध्ये सादर केला जाणार आहे.

Reliance Jio पुन्हा एकदा विक्रम करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने जूनमध्ये घोषित केलेला Ultra Affordable 4G SmartPhone स्मार्टफोन आता ग्राहकांच्या हातात देण्याची वेळ आली आहे. जियो आणि Google यांनी एकत्र येऊन बनवलेला JioPhone Next स्मार्टफोन 10 सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी आठवडाभर आधी या स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु होऊ शकते. परंतु कंपनीच्या अधिकृत घोषणेच्या आधी जियोफोन नेक्स्टच्या प्री-बुकिंग, किंमत आणि सेलची माहिती मीडिया रिपोट्समधून समोर आली आहे. 

ET NOW रिपोर्टमधून JioPhone Next स्मार्टफोनसंबंधित महत्वाची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन विकत घेण्यासाठी युजर्सना संपूर्ण किंमत द्यावी लागणार नाही. एकूण किंमतीच्या 10 टक्के रक्कम डाउनपेमेंट म्हणून देऊन ग्राहकांना हा फोन घरी नेता येईल. उर्वरित किंमत ईएमआय स्वरूपात चुकती करता येईल. यासाठी जियोने State Bank of India (SBI), Piramal Capital, IDFC First Assure, DMI Finance आणि चार नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपन्यांशी भागेदारी केली आहे.  

दोन मॉडेल्समध्ये येणार JioPhone Next 

JioPhone Next स्मार्टफोन दोन मॉडेल्समध्ये सादर केला जाणार आहे. JioPhone Next Basic आणि JioPhone Next Advance अशी या दोन मॉडेल्सची नावे असतील, असे रिपोर्ट्समधून समजले आहे. यातील जियोफोन नेक्स्टच्या बेसिक मॉडेलची किंमत 5,000 रुपयांच्या आसपास असेल आणि जियोफोन नेक्स्ट अ‍ॅडव्हान्स मॉडेल 7,000 रुपयांच्या आसपास बाजारात सादर केला जाईल.  

500 डाउनपेमेंटमध्ये मिळणार JioPhone Next 

वर सांगितल्याप्रमाणे जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोन एकूण किंमतच्या फक्त 10% रक्कम देऊन विकत घेता येईल. असे असल्यास 5,000 रुपयांच्या जियोफोन नेक्स्ट बेसिक मॉडेलसाठी ग्राहकांना फक्त 500 रुपये द्यावे लागतील. तसेच 7,000 रुपयांचा जियोफोन नेक्स्ट अ‍ॅडव्हान्स व्हेरिएंट फक्त 700 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु या दोन्ही किंमती अजूनही अधिकृत झालेल्या नाहीत. येत्या काही दिवसात या बहुप्रतीक्षित स्मार्टफोनची संपूर्ण माहिती समोर येईल.  

Web Title: reliance jio Jiophone next 4g smartphone will be availble at 10 percent down payment of sale price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.