मुकेश अंबानींची बादशाही धोक्यात; रिचार्ज महागले, जिओला लाखो ग्राहकांचा गुडबाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:47 PM2022-03-31T14:47:18+5:302022-03-31T21:21:38+5:30

Jio ने जानेवारी 2022 मध्ये 93,32,583 ग्राहक गमावले आहेत. Vodafone Idea आणि BSNL कडे देखील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.  

Reliance Jio Lost More Than 93 Lakhs Users In January 2022 Airtel Added New Subscribers  | मुकेश अंबानींची बादशाही धोक्यात; रिचार्ज महागले, जिओला लाखो ग्राहकांचा गुडबाय

मुकेश अंबानींची बादशाही धोक्यात; रिचार्ज महागले, जिओला लाखो ग्राहकांचा गुडबाय

Next

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपले टॅरिफ वाढवले होते. तेव्हापासून देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी Jio चे ग्राहक कंपनीला सोडून जात आहेत. याची माहिती टेलीकॉम रेगुलेरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या मासिक रिपोर्टमधून मिळाली आहे. रिपोर्टनुसार, Jio ने जानेवारी 2022 मध्ये 93,32,583 ग्राहक गमावले आहेत.  

ट्रायच्या रिपोर्टनुसार, Vodafone Idea आणि BSNL ला देखील ग्राहक सोडून जात आहेत. Vi ने 3,89,082 ग्राहक गमावले आहेत. तर BSNL चे 3,77,520 ग्राहक नेटवर्क सोडून गेले आहेत. या महिन्यात फायदा मात्र भारती एयरटेलचा झाला आहे. अन्य कंपन्यांचे युजर्स कमी होत असताना एयरटेलने जानेवारी 2022 मध्ये 7,14,199 नवीन ग्राहक जोडले आहेत.  

व्हायरलाईन सबस्क्रायबरमध्ये Jio ची बाजी  

ट्रायनं व्हायरलाईन सबस्क्रायबर बेसचे आकडे देखील प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार जियोने जानेवारीमध्ये सर्वाधिक 3,08,340 नवीन व्हायरलाईन सबस्क्रायबर जोडले आहेत. त्यामागे भारती एयरटेलने 94010 सबस्क्रायबरजोडून दुसरं स्थान मिळवलं आहे. तर बीएसएनएल (32098 सबस्क्रायबर) आणि Quadrant (16,749 सबस्क्रायबर) तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. एमटीएनएल आणि वोडाफोन आयडियाचे व्हायरलाईन सबस्क्रायबर मात्र कमी झाले आहेत.  

सरकारी कंपनी बीएसएनएल ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये अग्रस्थानी होती. परंतु Jio च्या JioFiber ब्रॉडबँडनं जानेवारीमध्ये सर्वाधिक ग्राहक जोडले आहेत. त्यापाठोपाठ Airtel चा नंबर लागला आहे. या दोन्ही कंपन्यांनी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला मागे टाकेल आहे.  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जियोनं आता 31 दिवसांची वैधता असलेला प्लॅन सादर केला आहे. 

Reliance Jio Calendar Month Validity Prepaid Plan 

Jio च्या अन्य प्रीपेड रिचार्ज प्रमाणे 259 रुपयांचा प्लॅन देखील अनेक वेळा रिचार्ज करून ठेवता येईल. जेव्हा तुमचा सुरु असलेल्या प्लॅनची वैधता संपेल तेव्हा रांगेत असलेला पुढील रिचार्ज सक्रिय होईल. तसेच या प्लॅनमुळे तुमची रिचार्जची तारीख वारंवार बदलणार नाही.  259 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 1.5GB डेटा रोज मिळेल, त्याचबरोबर अमर्याद कॉल्स आणि रोज 100 SMS मोफत दिले जातील.  

Web Title: Reliance Jio Lost More Than 93 Lakhs Users In January 2022 Airtel Added New Subscribers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.