Reliance Jio Offer: Jio ची दररोज १० लाख रुपये जिंकण्याची जबरदस्त ऑफर; त्वरा करा, राहिलेत फक्त काही दिवस, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:14 PM2022-09-07T13:14:38+5:302022-09-07T13:15:03+5:30

Reliance Jio Offer: कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीनं आता आपल्या युझर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.

reliance jio offer win upto 10 lakh daily check last date and offer details | Reliance Jio Offer: Jio ची दररोज १० लाख रुपये जिंकण्याची जबरदस्त ऑफर; त्वरा करा, राहिलेत फक्त काही दिवस, जाणून घ्या...

Reliance Jio Offer: Jio ची दररोज १० लाख रुपये जिंकण्याची जबरदस्त ऑफर; त्वरा करा, राहिलेत फक्त काही दिवस, जाणून घ्या...

googlenewsNext

Reliance Jio Offer: कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या रिलायन्सजिओ कंपनीनं आता आपल्या युझर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. जिओ सिमकार्ड धारकांना दररोज १० लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हो, हे खरं आहे. तुम्ही जर जिओचे कस्टमर असाल तर तुम्हाला १० लाख रुपये कमाई करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल याची माहिती जाणून घेऊयात. 

Jio Offer 10 Lakhs: पाहा ऑफर अन् डिटेल्स
१० लाख रुपये जिंकण्यासाठी यूझर्सना २९९ रुपये किंवा त्यापेक्षी अधिक किमतीचा रिचार्ज करावा लागेल. महत्वाची बाब म्हणजे ही ऑफर तामिळनाडू क्षेत्रासाठी उपलब्ध नाही. म्हणजेच ही ऑफर इतर सर्व भागांसाठी वैध आहे. 

रिलायन्स जिओची ही ऑफर ६ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. ऑफरची संपूर्ण माहिती जिओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी कंपनीनं ६ वर्ष पूर्ण केली आहेत. जिओची ही ऑफर सध्या लाइव्ह आहे आणि यूझर्स रिचार्जकरुन याचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, रिलायन्स जिओकडून या ऑफर संदर्भातील नियम आणि अटींची अधिक माहिती जाहीर केलेली नाही.

Web Title: reliance jio offer win upto 10 lakh daily check last date and offer details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.