तुम्हाला माहीत आहे का? Reliance Jio ची 'ही' सेवा आहे मोफत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 17:38 IST2018-08-12T17:36:06+5:302018-08-12T17:38:19+5:30
तुमच्याकडे रिलायन्स जिओचे सिम कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या सेवेचा फायदा घेऊ शकता.

तुम्हाला माहीत आहे का? Reliance Jio ची 'ही' सेवा आहे मोफत...
नवी दिल्ली : मोबाइल टेलिकॉमच्या क्षेत्रात रिलायन्स जिओ (Reliance Jio) आल्यापासून ग्राहकांना फक्त डेटा स्वस्त नाही, तर अनेक सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत. अशीच आणखी एक सेवा रिलायन्स जिओने बाजारात आणली आहे. यामध्ये ग्राहक कॉलरला आपल्या मनपसंतीचे गाणे ऐकवू शकतात. म्हणजेच जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपल्याला कॉल आला, तर रोजच्याच ट्रिंग-ट्रिंग या बेलच्या ऐवजी त्याला एखादे चांगणे गाणे ऐकू जाणार.
दरम्यान, रिलायन्स जिओ टेलिकॉम क्षेत्रात येण्याआधी बाकीच्या कंपन्या या सेवेसाठी दरमहा 30 ते 45 रुपये दर आकारत होत्या. मात्र, रिलायन्स जिओच्या लॉन्चिंगनंतर ही सेवा रिलायन्स जिओने मोफत केली. त्यानंतर इतर कंपन्यांनी ही सेवा मोफत नाही, परंतू काही या सेवेचे शुल्क कमी केले.
तुमच्याकडे रिलायन्स जिओचे सिम कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या सेवेचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी खालील दिलेल्या टीप पहा..
- सर्वात आधी मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून Jio Music अॅप डाऊनलोड करा.
- त्यानंतर तुम्ही कॉलर्सला जे गाणे ऐकवणार आहे, ते शोधा.
- शोधलेले गाणे चालू करा आणि Set As Jio Tune ऑप्शनवर क्लिक करा.
- Set As Jio Tune ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दुस-यांना तुम्हाला कन्फर्मेशन मागितले जाईल.
- कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला जिओ टोन सर्व्हिस अॅक्टिव्ह झाल्याचा मेसेज येईल.
- दरम्यान, ही सुविधा आतापर्यंत मोफत आहे. मात्र काही गाण्यांसाठी Jio Music अॅपवर जिओ टोन उपलब्ध नाहीत.