Jio युजर्ससाठी खुशखबर! 2 दिवसांचा अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा प्लॅन मिळणार मोफत; जाणून घ्या कारण
By सिद्धेश जाधव | Updated: October 7, 2021 17:51 IST2021-10-07T17:48:39+5:302021-10-07T17:51:54+5:30
Reliance Jio Plans and Offers: ज्या दोन सर्कल्समध्ये Jio चे नेटवर्क 6 ऑक्टोबरला डाउन झाले होते त्या सर्कलमधील ग्राहकांना कंपनी दोन दिवसांचा अनलिमिटेड प्लॅन मोफत देत आहे.

Jio युजर्ससाठी खुशखबर! 2 दिवसांचा अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा प्लॅन मिळणार मोफत; जाणून घ्या कारण
6 ऑक्टोबरला सकाळी काही वेळासाठी रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याची माहिती समोर आली होती. नेटकऱ्यांनी ट्विटरवर #jiodown ट्रेंड देखील केला होता. आता Reliance Jio अशा ग्राहकांना दोन दिवसांचा अनलिमिटेड प्लॅन ऑफर करत आहे. यात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या ग्राहकांचा समावेश आहे.
ग्राहकांना झालेल्या असुविधेची भरपाई म्हणून कंपनीने ही ऑफर सादर केली आहे. बुधवारी रिलायन्स जिओचे नेटवर्क मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही शहरांमध्ये डाउन झाल्याची तक्रार ग्राहकांनी ट्विटरवरून केली होती. तसेच हजारो लोकांनी जियो कनेक्शनमधील समस्येची माहिती इंटरनेट आउटेज ट्रॅकर DownDetector वर देखील रिपोर्ट केली होती.
Jio ने नेटवर्क डाउनमुळे प्रभावित झालेल्या जियो युजर्सना एक मेसेज पाठवला आहे. ज्यात या दोन दिवसांच्या मोफत प्लॅनची माहिती देण्यात आली आहे. जियोने दिलेल्या माहितीनुसार हा प्लॅन जियो युजर्सच्या नंबरवर दिवसाच्या अखेरपर्यंत क्रेडिट केला जाईल. हा प्लॅन चालू प्लॅनची वैधता संपल्यावर अॅक्टिव्हेट होईल.