नव्या वर्षात जिओ देणार 'मोठी' भेट; यूजर्सना करणार आणखी 'स्मार्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:47 PM2018-12-26T14:47:31+5:302018-12-26T14:58:20+5:30
रिलायन्स जिओने (Reliance Jio) आधी स्वस्तात इंटरनेट सुविधा देऊन टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांसाठी आकर्षक भेट घेऊन येणार आहे.
रिलायन्स जिओने (Reliance Jio) आधी स्वस्तात इंटरनेट सुविधा देऊन टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांसाठी आकर्षक भेट घेऊन येणार आहे. रिलायन्स जिओ मोठी स्क्रिन असणारा स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीमध्ये आहे. सध्याच्या नवीन सुविधांनी अद्ययावत स्मार्टफोन्सला टक्कर देण्यासाठी रिलायंस जिओ पार्टनर्ससोबत एकत्र येऊन जोमाने काम करत आहे. सध्या अशी काही लोकं आहेत ज्यांना, फिचर फोनकडून 4G स्मार्टफोनमध्ये अपग्रेड होण्याची इच्छा आहे. त्या ग्राहकांना टार्गेट करण्याचा रिलायंस जिओचा मानस असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रिलायन्स जिओचे चॅनल डेव्हलपमेंटचे हेड सेल्स सुनील दत्त यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला सांगितले की, आम्ही आमच्या भागीदार असलेल्या कंपन्यांसोबत एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करत आहोत. याचा फायदा एका सर्वात मोठ्या समुदायाला होणार असून त्यामुळे त्यांना लार्ज स्क्रिन असणाऱ्या स्वस्त स्मार्टफोन खरेदी करणं शक्य होणार आहे. तसेच जिओ काही महिन्यांच्या अंतराने काहीनाकाही नवीन घेऊन येणार असल्याचेही सांगितले.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ भारतामध्ये जवळपास 10 कोटी स्मार्टफोन तयार करण्यासाठी अमेरिकेच्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर Flex सोबत हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ Apple, Samsung, Xiaomi आणि Oppo यांसारख्या टॉप कंपन्यांसह अनेक ब्रँडसोबत एकत्र येऊन काम करते. या पार्टनरशिपसाठी रिलायन्स जिओ पहिल्यांदाच बायर्ससाठी स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यासाठी ऑफर्स देणार आहे.