जिओचा शानदार प्लॅन, युजर्सना ३३६ दिवस मिळतील कमी किमतीत अनेक बेनिफिट्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 18:31 IST2024-12-18T18:30:26+5:302024-12-18T18:31:11+5:30

Reliance Jio Prepaid Plan : जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केल्यानंतर अनेक नवीन प्लॅन्स आणले आहेत. यामधील जिओच्या एका प्लॅनबद्दल जाणून घ्या...

Reliance Jio Prepaid Plan : users will get many benefits at a low price for 336 days! | जिओचा शानदार प्लॅन, युजर्सना ३३६ दिवस मिळतील कमी किमतीत अनेक बेनिफिट्स!

जिओचा शानदार प्लॅन, युजर्सना ३३६ दिवस मिळतील कमी किमतीत अनेक बेनिफिट्स!

Reliance Jio Prepaid Plan : उद्योगपती मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्सजिओचे देशात करोडो युजर्स आहेत. जिओ आपल्या युजर्सना विविध किंमतीच्या रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. हे प्लॅन विविध बेनिफिट्ससह येतात. डेटा आणि व्हॅलिडिटीनुसार हे बेनिफिट्स बदलतात.

परंतु, काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने युजर्स नाराज झाले होते. यानंतर अनेक युजर्सनी आपले नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट केल्याचे दिसून येते. यानंतर जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केल्यानंतर अनेक नवीन प्लॅन्स आणले आहेत. यामधील जिओच्या एका प्लॅनबद्दल जाणून घ्या...

कमी किमतीत ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन
काही काळापूर्वी जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केला आणि नवीन रिचार्ज प्लॅन्स बाजारात आणले. यापैकी एक असा प्लॅन आहे, ज्यामध्ये ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते आणि या प्लॅनची किंमत फक्त १८९९ रुपये आहे. या किंमतीत ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी देणारा जिओचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. याचबरोबर, कमी किंमतीमुळे इतर बेनिफिट्स मिळत नाहीत, असे नाही. यामध्ये युजरला इतर सर्व बेनिफिट्सही मिळतात.

प्लॅनचे बेनिफिट्स
या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ असा की देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके अनलिमिटेड कॉलिंग करता येईल. याशिवाय, युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर ३६०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळते. इंटरनेट वापरण्यासाठी युजर्सना या प्लॅनमध्ये २४ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. मात्र, डेटा संपल्यानंतर तुम्ही पुन्हा रिचार्ज करू शकता.

या युजर्ससाठी सर्वोत्तम प्लॅन
याशिवाय, या प्लॅनमध्ये युजर्सना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ज्या युजर्सना कमी इंटरनेटची गरज आहे आणि कमी किमतीत जास्त व्हॅलिडिटी असलेला प्लॅन हवा आहे. त्यांच्यासाठी हा प्लॅन शानदार होऊ शकतो.

Web Title: Reliance Jio Prepaid Plan : users will get many benefits at a low price for 336 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.