जिओने 98 आणि 149 चे प्लॅन पुन्हा आणले; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:06 PM2019-12-08T13:06:28+5:302019-12-08T13:07:55+5:30
आययुसीमुळे सुरु झालेल्या वादाने कंपन्यांमध्ये पुन्हा टेरिफची स्पर्धा तीव्र केली आहे.
मुंबई : आययुसीमुळे सुरु झालेल्या वादाने कंपन्यांमध्ये पुन्हा टेरिफची स्पर्धा तीव्र केली आहे. रिचार्जमध्ये 40 टक्के वाढ केल्यानंतर व्होडाफोन, एअरटेलसहजिओने नरमाईची भूमिका घेतली आहे. अन्य नेटवर्कवर बोलण्यासाठई ग्राहकांकडून ६ पैसे प्रति मिनिट आकारले जाणार होते. यामुळे कंपन्यांनी रिचार्ज वाढविली होती. मात्र ग्राहक नाराज झाल्याने पुन्हा अनलिमिटेड मोफत कॉलिंग देऊ केले आहे.
यामुळे या कंपन्यांना नाकीनऊ आणणारी रिलायन्सची कंपनी जिओने पुन्हा त्यांचे 98 आणि 149 रुपयांचे प्लॅन लाँच केले आहेत. यामुळे पुन्हा ही स्पर्धा वाढणार आहेत. जिओने हे प्लॅन जरी आणले असले तरीही त्या प्लॅनची वैधता कमी केली आहे. म्हणजेच आधी 28 दिवसांचे रिचार्ज होते. आता यामध्ये दिवस कमी करण्यात आले आहेत.
जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय काय?
जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये दर दिवसाला 1 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच कंपनी जिओ टू जिओ नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग देणार आहे. दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी कंपनी 300 एफयुपी मिनिट देणार आहे. याशिवाय ग्राहक जिओची अॅपही मोफत वापरू शकणार आहेत. केवळ एक बदल म्हणजे या प्लॅनची मुदत 24 दिवसांची म्हणजेच 4 दिवस कमी करण्यात आले आहेत. हा एक बदल वगळता जुन्या प्लॅनप्रमाणेच सारे काही असणार आहे.
जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय काय?
जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 2 जीबीचा डेटा मिळणार आहे. याशिवाय ग्राहक जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉल करू शकणार आहेत. मात्र, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. या व्हऊचरची सुरुवात 10 रुपयांपासून होत आहे. या 98 रुपयांच्या प्लॅनची मुदत 28 रुपये आहे.
Jio's New All-in-one Plans, now available on https://t.co/oPhMxUXJfK and MyJio.
— Reliance Jio (@reliancejio) December 6, 2019
Know more: https://t.co/37YfWq2cyg#JioDigitalLife#NewJioPlans#JioRechargepic.twitter.com/PBpNBNoXlG
याशिवाय जिओने 199 रुपयांपासून अन्य प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये 1.5 जीबी डेटा आणि 28 दिवसांची मुदत मिळणार आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिट मिळणार आहेत. तसेच 399 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना रोजचा 1.5 जीबी डेटा मिळतो. तसेच अन्य नेटवर्कवर 2000 मिनिट मोफत मिळणार असून 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. हे दोन्ही प्लॅन कंपनीने 6 डिसेंबरला लागू केले आहेत.