रिलायन्स जिओ आता स्वस्त लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत; जाणून घ्या किती असेल किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 12:49 PM2022-10-03T12:49:06+5:302022-10-03T12:50:09+5:30

Reliance Jio : कंपनी बजेट 5G फोनसह स्वस्त लॅपटॉप JioBook लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

reliance jio to launch 4g enabled low cost laptop jio book | रिलायन्स जिओ आता स्वस्त लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत; जाणून घ्या किती असेल किंमत?

रिलायन्स जिओ आता स्वस्त लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत; जाणून घ्या किती असेल किंमत?

googlenewsNext

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio) लवकरच बजेट लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे. या लॅपटॉपची किंमत जवळपास 15 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. रिलायन्सने जिओच्या आधी स्वस्त फोनही लाँच केले आहेत. आता कंपनी बजेट 5G फोनसह स्वस्त लॅपटॉप JioBook लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

एका रिपोर्टनुसार, या लॅपटॉपची किंमत184 डॉलर (जवळपास 15 हजार रुपये) ठेवली जाईल. कंपनी याद्वारे बजेट सेगमेंटमध्ये स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासंबंधीची माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सच्या सोर्सने दिली आहे. 

अंबानींच्या कंपनीने JioBook साठी ग्लोबल-जायंट Qualcomm आणि Microsoft सोबत भागीदारी केली आहे. याशिवाय, कंपनी आर्म लिमिटेड आणि अनेक अॅप्सना सपोर्ट करण्यासाठी Windows OS चीही मदत घेणार आहे. सध्या ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

कंपनीचे 420 मिलियनहून अधिक ग्राहक आहेत. मात्र, कंपनीने सध्या या लॅपटॉपबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हा लॅपटॉप या महिन्यापासून शाळा आणि सरकारी संस्थांसारख्या एंटरप्राइझ ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाईल. 

हा लॅपटॉप 4G-एनेबल्ड असणार आहे. तर हा स्वस्त लॅपटॉप ग्राहकांसाठी पुढील तीन महिन्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या सेगमेंटमध्ये या लॅपटॉपची मागणी खूप जास्त असू शकते, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी कंपनीने स्वस्त JioPhone लाँच केला होता.

Counterpoint च्या रिपोर्टनुसार, हा फोन 100 डॉलरच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन बनला आहे. JioBook बाबत असे सांगण्यात आले आहे की, ते लोकल मॅन्युफॅक्चरर फ्लेक्ससह तयार केले जाईल. मार्चपर्यंत कंपनी लाखो युनिट्स विकण्याचे प्लॅनिंग करत आहे.

Web Title: reliance jio to launch 4g enabled low cost laptop jio book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.