कोट्यवधी इनअ‍ॅक्टिव्ह युजर्स तरीही Reliance Jio 'नंबर वन'; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 03:24 PM2020-10-13T15:24:29+5:302020-10-13T15:30:45+5:30

Reliance Jio : रिलायन्स जिओकडे सर्वात जास्त सब्सक्रायबर्स असले तरी इनअ‍ॅक्टिव्ह सब्सक्रायबर्समध्ये हे एअरटेल आणि वोडाफोनच्या पुढे आहे.

reliance jio tops in subscriber base and also in number of inactive user | कोट्यवधी इनअ‍ॅक्टिव्ह युजर्स तरीही Reliance Jio 'नंबर वन'; 'हे' आहे कारण

कोट्यवधी इनअ‍ॅक्टिव्ह युजर्स तरीही Reliance Jio 'नंबर वन'; 'हे' आहे कारण

googlenewsNext

नवी दिल्ली - रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकत पुन्हा एकदा बाजी मारली आहे. जिओ देशातील पहिली टेलिकॉम कंपनी बनली असून त्यांच्याकडे तब्बल 40 कोटी सब्सक्रायबर्स आहेत. जुलैमध्ये कंपनीने 35.5 लाख नवीन युजर्स आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत. मात्र कंपनीच्या अ‍ॅक्टिव्ह युजर्समध्ये 8.5 कोटींहून अधिक कमी आहे. याच दरम्यान जुलैमध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीला 35 लाख युजर्संचा फायदा झाला आहे. ऑफलाईन चॅनेल्स उघडल्यानंतर आणि इकॉनॉमी वेग पकडण्यासाठी देशात सब्सक्रायबर्सची संख्या वाढून 114.4 कोटी झाली आहे.

जून 2020 मध्ये भारती टेलिकॉम सब्सक्रायबर्समध्ये 32 लाखांनी कमी झाली होती. ट्रायच्या लेटेस्ट डेटाच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओकडे सर्वात जास्त सब्सक्रायबर्स असले तरी इनअ‍ॅक्टिव्ह सब्सक्रायबर्समध्ये हे एअरटेल आणि वोडाफोनच्या पुढे आहे. जिओच्या अ‍ॅक्टिव्ह युजर्संमध्ये  8.78 कोटींची कमी आली आहे. तर एअरटेलच्या इनअ‍ॅक्टिव्ह युजर्संची संख्या 95 लाख आणि वोडाफोन-आयडियाच्या इनअ‍ॅक्टिव्ह युजर्संची संख्या  3.21 कोटी आहे.

...म्हणून काहींनी जिओ वापरणं केलं बंद

रेटिंग एजन्सी फिचचे सीनियर डायरेक्टर नितीन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओच्या इनअ‍ॅक्टिव्ह युजर्समध्ये लॉकडाऊनमुळे अन्य शहरातील मायग्रेंट आहेत. त्यांनी आता जिओ नंबर वापरणे बंद केलं आहे. जुलैच्या शेवटी जिओची एकूण संख्या 40.08 कोटी आहे. एअरटेलने जुलैमध्ये 32.6 लाख वायरलेस सब्सक्रायबर्स अ‍ॅड केले आहेत. तसेच एअरटेलच्या एकूण युजर्सची संख्याही  31.99 कोटी राहिली आहे. अ‍ॅक्टिव्ह युजर्स 97 टक्के आहेत.

वोडाफोन-आयडिया कंपनीच्या अडचणीत वाढ 

वोडाफोन-आयडिया कंपनीच्या अडचणीत वाढ होत आहे. जुलैमध्ये वोडाफोन-आयडियाच्या युजर्सची संख्या 37.2 लाखाने कमी झाली आहे. कंपनीच्या युजर्संची संख्या कमी होऊन 30.13 कोटी झाली आहे. यात 89.33 टक्के अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहे. अ‍ॅक्टिव्ह युजर्सला ट्रॅक करण्यासाठी VLR (विजिटर लोकेशन रजिस्टर) चा वापर केला जातो. हे त्या युजर्सला टेंपररी रजिस्टर होतात. हे एका जागेतून दुसऱ्या जागेवर जातात. जर कोणताही सब्सक्रायबर अ‍ॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतो तर तो कॉलिंग आणि एसएमएस सर्व्हिस वापरतो. या आधारावर अ‍ॅक्टिव्ह युजर्स आणि इनअ‍ॅक्टिव्ह युजर्सची ओळख पटते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Web Title: reliance jio tops in subscriber base and also in number of inactive user

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.