रिलायन्स एलवायएफ सी ४५१ : काय आहेत फिचर्स ?

By शेखर पाटील | Published: August 16, 2017 07:50 PM2017-08-16T19:50:18+5:302017-08-16T19:50:32+5:30

रिलायन्स डिजीटलने आपल्या एलवायएफ मालिकेत एलवायएफ सी४५१ हा स्मार्टफोन ४,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याचे घोषीत केले आहे.

Reliance LVF C 451: What are the features? | रिलायन्स एलवायएफ सी ४५१ : काय आहेत फिचर्स ?

रिलायन्स एलवायएफ सी ४५१ : काय आहेत फिचर्स ?

Next

रिलायन्स डिजीटलने आपल्या एलवायएफ मालिकेत एलवायएफ सी४५१ हा स्मार्टफोन ४,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याचे घोषीत केले आहे.

रिलायन्स एलवायएफ सी ४५१ या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असून हा स्मार्टफोन जिओ सीमकार्डसह वापरता येईल. हे मॉडेल रिलायन्सच्या शॉपीगमधून ग्राहकांना खरेदी करता येणार असून हे घेणार्‍या ग्राहकाला जिओ सेवेत २० टक्के अधिक डाटा मिळणार आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी २.० आदी अन्य पर्यायदेखील देण्यात आले आहेत. यात पॉलीकार्बोनेटपासून तयार करण्यात आलेली बॉडी प्रदान करण्यात आली असून ग्राहकांना हे मॉडेल पांढर्‍या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. रिलायन्स एलवायएफ सी ४५१ या स्मार्टफोनमध्ये जेस्चर कंट्रोलची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने कुणीही फक्त हालचालींनी स्मार्टफोनवरील विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. यात स्मार्टफोन हलवून लॉक/अनलॉक करणे, संगीताचा आवाज कमी-जास्त करणे, विविध अ‍ॅप्स उघडणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या मॉडेलमध्ये अ‍ॅक्सलेरोमीटर, प्रॉक्झिमिटी व अँबिअंट लाईट आदी सेन्सर्सदेखील असतील. 

रिलायन्स एलवायएफ सी ४५१ या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅशसह ५ मेगापिक्सल्सचा मुख्य तर २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यातील मुख्य कॅमेर्‍यात पॅनोरामा, फेस डिटेक्शन, मल्टी शॉट, जिओ टॅगींग, रेड आय डिटेक्शन, फेस डिटेक्शन, टच टू फोकस, गेझ डिटेक्शन, ब्लिंक डिटेक्शन आदी फिचर्स देण्यात आले आहेत. उर्वरित फिचर्सचा विचार करता, रिलायन्स एलवायएफ सी ४५१ या स्मार्टफोनमध्ये ४.५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजेच ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा २डी डिस्प्ले असून यावर असाही ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन २१० एमएसएम ८९०९ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Web Title: Reliance LVF C 451: What are the features?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.